अकरावीत शिकणाऱ्या मुलाने केला २९ वर्षीय गतीमंद मुलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 18:35 IST2021-02-07T17:15:05+5:302021-02-07T18:35:12+5:30
Crime News आई शेतात कामासाठी गेली असताना आरोपी युवकाने मुलीच्या घरात घुसुन अतिप्रसंग व लैंगिक अत्याचार केला.

अकरावीत शिकणाऱ्या मुलाने केला २९ वर्षीय गतीमंद मुलीवर अत्याचार
बुलडाणा : इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या मुलाने २९ वर्षीय गतिमंद तरुणीवर अत्याचार केल्याची घटना बुलडाणा तालुक्यातील एका गावात ६ फेब्रुवारी राेजी घडली. याप्रकरणी रात्री उशिरा बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
२९ वर्षीय गतिमंद मुलगी विधवा आईसोबत एका गावात राहते.आई हातमजुरी करून उदरनिर्वाह करते. ६ फेब्रुवारी राेजी गतिमंद मुलीची आई शेतात कामासाठी गेली असताना आरोपी युवकाने मुलीच्या घरात घुसुन अतिप्रसंग व लैंगिक अत्याचार केला. मुलीच्या ओरडण्याने हा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात आला असता आरोपी तेथुन पळुन गेला. मुलीच्या आईला बोलावण्यात आल्यानंतर हा प्रकार पोलिसांना कळवण्यात आला.पोलिसांनी घटनास्थळ गाठुन मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत असले तरी तो फरार असल्याने त्याचे वय निष्पन्न झाले नसल्याचे पाेलिसांनी सांगितले.