तू मला का मारलंस, आता मी हिला मारणार! निर्दयी सुनेनं सासूच्या कानशिलात लगावल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 16:25 IST2021-09-12T16:19:03+5:302021-09-12T16:25:26+5:30

सुनेची सासूला मारहाण; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; दोन्ही बाजूंकडून तक्रार दाखल

elderly woman brutally beaten by daughter in law video goes viral in gurugram | तू मला का मारलंस, आता मी हिला मारणार! निर्दयी सुनेनं सासूच्या कानशिलात लगावल्या

तू मला का मारलंस, आता मी हिला मारणार! निर्दयी सुनेनं सासूच्या कानशिलात लगावल्या

गुरुग्राम: निर्दयी सुनेनं सासूच्या कानशिलात लगावल्याची घटना हरयाणाच्या गुरुग्राममध्ये घडली आहे. सून तिच्या सासूला मारहाण करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर दोन दिवसांपासून व्हायरल झाला आहे. त्यानंतर शनिवारी पोलिसांनी दोन्ही बाजूच्या तक्रारी नोंदवल्या.

सुनेकडून मारहाण झालेल्या महिलेचं नाव अंशू जिंदल आहे. त्या घराच्या वरच्या मजल्यावर राहतात. त्यांचा मुलगा, सून आणि त्यांची मुलं पहिल्या मजल्यावर वास्तव्यास आहेत. वृद्ध असल्यानं आता त्यांना घरातील कामं जमत नाहीत. त्यामुळे त्यांनी मुलाला सांगून त्यांनी घरकामासाठी एका महिलेला बोलावलं. त्यामुळे अंशू यांच्या सुनेला (कविता) राग आला. तिनं अंशू यांना मारहाण केली. 

व्हिडीओ सेव्ह करणार होती महिला कॉन्स्टेबल, चुकून अपलोड झाले Whatsapp स्टेटस, अन्...

अंशू यांनी कविताविरोधात शुक्रवारी रात्री पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अंशू यांच्य चेहऱ्यावर आणि शरीरावर अन्य ठिकाणी मारहाणीमुळे जखमा झाल्या आहेत. त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कविता अंशू यांना मारहाण करताना दिसत आहेत. तुम्ही मला का मारलं, आता मी हिला मारणार, असं म्हणत कवितानं अंशू यांच्या कानशिलात लगावल्या. अशा प्रकारचं वर्तन योग्य नाही, अशा शब्दांत कविताच्या पतीनं तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र कविता ऐकायच्या मनस्थितीत नव्हती. या दरम्यान घरात मुलांच्या रडण्याचा आवाज व्हिडीओत ऐकू येत आहे.
 

Web Title: elderly woman brutally beaten by daughter in law video goes viral in gurugram