बांधकामाच्या वादातून वृद्धावर प्राणघातक हल्ला

By योगेश पांडे | Updated: January 4, 2024 17:16 IST2024-01-04T17:16:36+5:302024-01-04T17:16:53+5:30

रामचंद्र व राजू हे दोघेही शेजारी असून घराच्या मागील जागेवर बांधकाम करण्याच्या मुद्द्यावरून त्यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू होता.

Elderly man assaulted over construction dispute | बांधकामाच्या वादातून वृद्धावर प्राणघातक हल्ला

बांधकामाच्या वादातून वृद्धावर प्राणघातक हल्ला

नागपूर : बांधकामाच्या वादातून एका वृद्धावर भर रस्त्यात प्राणघातक हल्ला करण्यात आला. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. रामचंद्र मारोतराव खापरे (६४, झाडे चौक, लालगंज) असे जखमीचे नाव असून राजू रामाजी मोहाडीकर (४९) हा आरोपी आहे. 

रामचंद्र व राजू हे दोघेही शेजारी असून घराच्या मागील जागेवर बांधकाम करण्याच्या मुद्द्यावरून त्यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. बुधवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास रामचंद्र हे चखना चौक येथे मोटार दुरुस्त करत असताना राजू तेथे पोहोचला व त्याने वाद घालण्यास सुरुवात केली. 

अनपेक्षितपणे त्याने लोखंडी पाईपने रामचंद्र यांच्या डोक्यावर वार केले. यात ते जखमी झाले. त्यानंतर आरोपी फरार झाला. घटनास्थळावरील लोकांनी रामचंद्र यांना एका खाजगी इस्पितळात दाखल केले. रामचंद्र यांचे भाऊ राजेंद्र खापरे यांच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Web Title: Elderly man assaulted over construction dispute