शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धेवर रुग्णालयात उपचार करून सोडले घरी; घरात सापडला लाखोंचा ऐवज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 18:46 IST

Crime News : वृद्धेवर रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले असून नातेवाईकांचा शोध घेतला जात आहे. 

ठळक मुद्देवृद्धेच्या कपाटातून जुन्या ५०० रूपयांच्या एकून ८५ हजाराच्या नोटा, तसेच १०० रुपयांच्या नोटांचे एक लहान बंडल, सोन्याच्या बांगळ्या, कुंडले, विविध दोन बँकेत प्रत्येकी २ व १ लाख रुपये आणि फिक्स डिपॉझिट मध्ये ८ लाख असे लाखोंचे घबाड मिळाले.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : कॅम्प नं-४ परिसरातील एका पडक्या बैरेकच्या घरात राहणाऱ्या वृद्धेच्या घरात पोलीस तपासणीत सोन्याच्या दागिन्यासह जुन्या नोटा व विविध योजनेत लाखो रुपये गुंतविल्याचे उघड झाले. वृद्धेवर रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले असून नातेवाईकांचा शोध घेतला जात आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं-४ परिसरातील पडक्या बैरेकच्या घरात ८० वर्षाच्या वृद्ध कौशल्या वाधवा एकट्याच राहत असून त्यांची तब्येत बरोबर नसल्याची माहिती उल्हासनगर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश तेजवानी व समाजसेवक पप्पू पमनानी यांना मिळाली. वृद्ध व आजारी कौशल्या वाधवा यांना रुग्णालयात उपचारासाठी नेल्यास, घरात चोरी होईल. असा संशय आल्यावर, याबाबतची माहिती सहायक आयुक्त डी टी टेळे व विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांना दिली. त्यांनी तेजवानी यांच्यासोबत उपनिरीक्षक आर.आर.पाटील यांच्यासोबत दोन पोलीस हवालदाराला पाठविले. त्यांनी वृद्ध कौशल्या वाधवा यांच्या सहमतीने घरातील मोठे कपाट उघडून रीतसर पंचनामा केला.

वृद्धेच्या कपाटातून जुन्या ५०० रूपयांच्या एकून ८५ हजाराच्या नोटा, तसेच १०० रुपयांच्या नोटांचे एक लहान बंडल, सोन्याच्या बांगळ्या, कुंडले, विविध दोन बँकेत प्रत्येकी २ व १ लाख रुपये आणि फिक्स डिपॉझिट मध्ये ८ लाख असे लाखोंचे घबाड मिळाले. पोलिसांनी सर्व ऐवज पंचनामा करून ताब्यात घेतला. वृद्धेला रुग्णालयात उपचार केल्यानंतर, घरी सोडण्यात आले असून रोख रक्कम, सोन्याचे दागिने, बँकेचे फिक्स डिपॉझिट कागदपत्रे व खाते असा ऐवज वृद्ध व नातेवाईकांच्या ताब्यात दिला. वृद्धेच्या पतीचे यापूर्वी निधन झाले असून त्यांना अपत्य नाही. गेल्या वर्षी मुंबईला राहणाऱ्या पुतण्याने निधन झाले असून त्यांची पत्नी जिवंत असल्याची माहिती जगदीश तेजवानी यांनी दिली. वृद्धेच्या घरात जुन्या ५०० रुपयांच्या नोटा, १०० रुपयांच्या नोटा, सोन्याचे दागिने, बँक खात्यात ३ लाख, ८ लाखाचे फिक्स डिपॉजिट मिळाल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीulhasnagarउल्हासनगरPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल