शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
11
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
12
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
13
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
14
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
15
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
16
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
17
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
18
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
19
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
20
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...

आठ महिन्यात एसीबीने लावले ५८० सापळे, लाचखोरीत महसूल खाते अव्वल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 21:16 IST

राज्यात लाच खाण्यात अव्वल महसूल विभाग असून १३७ सापळ्यात १८३ आरोपी  अडकले आहेत.

ठळक मुद्देराज्यात एसीबीच्या आठही विभागांनी ५८० सापळे १ जानेवारी ते ३० ऑगस्ट २०१९ दरम्यान टाकण्यात आले आहेत. त्यामुळे अधिकारी - कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असले तरी लाचखोरीत घट झालेली नाही. 

संदीप मानकर

अमरावती - राज्यातील विविध विभागांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबीने) केलेल्या आठ महिन्यांतील कारवाईत ५८० सापळे यशस्वी झाले आहेत. यात ७७८ आरोपी अडकले आहेत. अपसंपदेचे १४ आणि अन्य भ्रष्टाचाराचे चार तर एकूण ५९८ गुन्हे एसीबीने दाखल केले आहेत. राज्यात लाच खाण्यात अव्वल महसूल विभाग असून १३७ सापळ्यात १८३ आरोपी  अडकले आहेत.राज्यात एसीबीच्या आठही विभागांनी ५८० सापळे १ जानेवारी ते ३० ऑगस्ट २०१९ दरम्यान टाकण्यात आले आहेत. लाचलुचपत विभागाच्या कारवाईमध्ये १ कोटी ३५ लाख ५४ हजार ४३५ रुपये एवढी सापळा रक्कम होती. राज्यात करण्यात आलेल्या कारवाईत वर्ग १ चे ३७, वर्ग २ चे ६४ अधिकारी, तर सर्वाधिक वर्ग ३ चे ४६३ जण अडकले आहेत. सापळ्यांमध्ये महसूल, भूमिअभिलेख १३७ सापळे, पोलीस विभाग १३१ सापळे, महावितरण २४, महापालिका ३३, नगर परिषद १२, जिल्हा परिषद २७, पंचायत समिती ५३, वनविभाग १५, जलसंपदा विभाग ११, सार्वजनिक आरोग्य विभाग १५, आरटीओ १२, शिक्षण विभाग १९ यांच्यासह इतर अनेक विभागांचा यामध्ये समावेश आहे. एसीबीकडे नागरिकांच्या तक्रारी वाढल्यामुळे सापळे यशस्वी होत आहेत. त्यामुळे अधिकारी - कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असले तरी लाचखोरीत घट झालेली नाही. अपसंपदेची १४ प्रकरणे दाखलगेल्या आठ महिन्यांत अपसंपदेची एसीबीने १४ प्रकरणे दाखल केली. यात २६ जण अडकले असून ११ अधिकारी आणि १२ खासगी व्यक्तींचा समावेश आहेत. अपसंपदा प्रकरणातील मालमत्ता ही ७ कोटी ७९ लाख १७ हजार ६४९ एवढी असल्याची माहिती एसीबीने दिली. पुणे विभागात सर्वाधिक १२८ सापळेराज्यात सर्वाधिक १२८ सापळे हे पुणे विभागात यशस्वी झालेत. यामध्ये १७३ आरोपी अडकले आहेत. दुसऱ्या स्थानी ८५ सापळे औरंगाबाद विभागात टाकण्यात आले आहे. मुंबई विभागात सर्वात कमी २७, ठाणे विभाग ६०, नाशिक ७९, नागपूर ६६, अमरावती ७६ आणि नांदेड विभागात ५९ सापळे यशस्वी झाले आहेत. वर्षनिहाय सापळे वर्षे          सापळ्यांची संख्या २०११      ४३७२०१२      ४८९२०१३      ५८३२०१४       १२४५२०१५       १२३४२०१६      ९८५२०१७       ८७५२०१८      ८९१२०१९     ५८०

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागAmravatiअमरावतीRevenue Departmentमहसूल विभाग