शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दाऊदच्या भावासाठी ईडीची न्यायालयात धाव; सलीम फ्रुटची ९ तास कसून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 11:00 IST

मंगळवारी सकाळी ईडीने सलीमला डोंगरी भागातून ताब्यात घेतले होते. सलीम फ्रुट हा अनेकदा बनावट कागदपत्रांवर पाकिस्तानमध्ये गेला असून, तो दाऊद आणि शकीलच्या सांगण्यावरून मुंबईत काम करत असल्याचा संशय ईडीला आहे.

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मालमत्तेतील मनी लाँड्रिंग प्रकरणात, सक्तवसुली संचालनालयाने छोटा शकीलचा निकटवर्तीय सलीम कुरेशी ऊर्फ सलीम फ्रुट याची ९ तास चौकशी केली. काही कागदपत्रे सादर करण्यासाठी त्याला उद्या पुन्हा बोलावण्यात आले आहे. दुसरीकडे दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरच्या कोठडीसाठी ईडीने विशेष पीएमएलए कोर्टात अर्ज केल्याने १८ फेब्रुवारी रोजी त्याला न्यायालयात हजर करण्याचे आदेश ईडीला दिले. 

ईडीच्या हाती लागलेल्या महत्त्वपूर्ण कागदपत्रांच्या आधारे कासकरला अटक होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.इक्बाल कासकरला ठाणे पोलिसांनी २०१७ मध्ये एका खंडणी प्रकरणात अटक केली होती. ठाणे पोलिसांनी इक्बाल, अनिस इब्राहिम आणि इतरांविरुद्ध दाखल केलेल्या वसुलीच्या गुन्ह्यासंबंधित कागदपत्रे ईडीने ताब्यात घेतली आहेत. या कागदपत्रांच्या आधारे एनआयएने दाऊदशी संबंधित एका प्रकरणात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासात काही मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांबाबतची माहिती समोर आली होती. त्याआधारे ईडीने मनी लॉंड्रिंगचा गुन्हा दाखल करत, मंगळवारी मुंबईत ९ आणि ठाण्यातील एका ठिकाणी छापेमारी केली. यादरम्यान हाती लागलेल्या कागदपत्रांतून  महत्त्वाची माहिती ईडीच्या हाती लागली आहे. 

मंगळवारी सकाळी ईडीने सलीमला डोंगरी भागातून ताब्यात घेतले होते. सलीम फ्रुट हा अनेकदा बनावट कागदपत्रांवर पाकिस्तानमध्ये गेला असून, तो दाऊद आणि शकीलच्या सांगण्यावरून मुंबईत काम करत असल्याचा संशय ईडीला आहे. ईडीने फ्रुटसह दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरचे बँक खाते आणि संपत्तीची माहिती गोळा केली आहे. ईडीचे एक पथक इक्बालच्या भेंडी बाजार येथील घरी पोहोचले होते. मात्र तेथे कोणीही आढळले  नव्हते. इक्बाल कासकरच्या कोठडीसाठी ईडीने बुधवारी न्यायालयात अर्ज केला. ही टोळी खंडणी, तडजोड आणि ड्रग्जद्वारे पैसे गोळा करून त्याचा वापर दहशतवादी कारवायांसाठी किंवा हवालाद्वारे राष्ट्रविरोधी कारवाया करण्यासाठी करत असल्याचा संशय ईडीला आहे.

टॅग्स :Dawood Ibrahimदाऊद इब्राहिमEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय