शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Anil Deshmukh: अनिल देशमुख यांच्या चौकशीसाठी ईडीचे सहसंचालक दिल्लीहून मुंबईत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 06:45 IST

निर्दोष असल्याचा माजी गृहमंत्र्यांचा दावा; दरमहा १०० कोटींच्या कथित हप्ता गोळा करण्याच्या प्रकरणी दाखल मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात त्यांची दुपारी बारा वाजल्यापासून सुरू झालेली चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या काही महिन्यांपासून अज्ञातवासात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सोमवारी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात अखेर स्वतःहून हजर झाले. देशमुख यांच्या चौकशीसाठी ईडीचे सहसंचालक सत्यव्रत कुमार हे दिल्ली येथून खास विमानाने रात्री उशिरा मुंबईत दाखल झाल्याने या प्रकरणातील घडामोडींना वेग आला आहे. आपण निर्दोष असल्याचा दावा देशमुख यांनी केला आहे.

दरमहा १०० कोटींच्या कथित हप्ता गोळा करण्याच्या प्रकरणी दाखल मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात त्यांची दुपारी बारा वाजल्यापासून सुरू झालेली चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ईडीच्या मुंबई विभागाचा अतिरिक्त कार्यभार सत्यव्रत कुमार यांच्याकडे आहे. राजकीयदृष्ट्या  हे े प्रकरण संवेदनशील असल्याने देशमुख यांची चौकशी महत्त्वाची आहे. त्यामुळे याबाबत योग्यप्रकारे तपास करणे आवश्यक असल्याने सत्यव्रत कुमार यांना मुंबईत जाण्याची सूचना वरिष्ठांकडून करण्यात आली.

दरम्यान, आपण पळून गेलेलो नव्हतो, न्यायालयाच्या आदेशानुसार ईडी चौकशीला सहकार्य करू असे अनिल देशमुख यांनी ईडीसमोर हजर होण्यापूर्वी व्हिडिओद्वारे जाहीर केले. सीबीआय व ईडीकडून देशमुख यांची चौकशी केली जात आहे. ईडीने त्यांना पाच वेळा समन्स बजावले होते. मात्र, देशमुख वकिलामार्फत समन्स नोटिसीला उत्तर देत होते. त्यामुळे सीबीआय, ईडीकडून त्यांच्याविरुद्ध लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती.

सचिवही कोठडीतदेशमुख वकील इंद्रपाल सिंह यांच्यासह सोमवारी सकाळी ११.५० वाजता ईडीच्या कार्यालयात हजर झाले. त्यांचे खासगी सचिव संजीव पलांडे व स्वीय सहायक कुंदन शिंदे यांना ४ महिन्यांपूर्वी ईडीने अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय