आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) अटक केली आहे. आयसीआसीआय बँक व्हिडीओकॉन प्रकरणात ही कारवाई ईडीने केली आहे. आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. व्हिडीओकॉनला दिलेल्या कर्ज प्रकरणात चंदा कोचर यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला होता आणि त्यांच्या पतीला म्हणजेच दीपक कोचर यांना फायदा मिळवून दिला होता असा आरोप त्यांच्यावर आहे.आयसीआयसीआय - व्हिडीओकॉन प्रकरणी चंदा कोचर यांना ईडी अधिकाऱ्यांसमोर ३ मे रोजी हजर राहण्यासाठी समन्स बजाविण्यात आले होते. तर चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि दीर राजीव कोचर यांना देखील मुंबईतील तपास कार्यालयात ३० एप्रिल रोजी हजर राहण्यासाठी समन्स बजाविण्यात आले होते.गैरव्यवहार करून कर्ज दिल्या प्रकरणावरून आयसीआयसीआय बँकेच्या माजी अध्यक्ष चंदा कोचर आणि व्हिडिओकॉन समुहाचे वेणुगोपाल धूत यांच्या निवासस्थानांवर अंमलबाजवणी संचालनालय (ईडी) गेल्या काही महिन्यांपासून तपास करत आहे. मागील महिन्यात यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. कोचर यांनी तब्बल ३ हजार २५० कोटींचे कर्ज व्हिडिओकॉन समुहाला दिले आणि त्यातील काही पैसे त्याच्या पतीला देण्यात आले होते, असा त्यांच्यावर ठपका आहे. चंदा कोचर यांचे हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर त्यांना मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पदाचा राजीनामा द्यावा लागला. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मागच्याच महिन्यात त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून घेतला होता.
ईडीच्या कारवाईचा दणका सुरूच, दीपक कोचर यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 21:30 IST
व्हिडीओकॉनला दिलेल्या कर्ज प्रकरणात चंदा कोचर यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला होता आणि त्यांच्या पतीला म्हणजेच दीपक कोचर यांना फायदा मिळवून दिला होता असा आरोप त्यांच्यावर आहे.
ईडीच्या कारवाईचा दणका सुरूच, दीपक कोचर यांना अटक
ठळक मुद्देआयसीआयसीआय - व्हिडीओकॉन प्रकरणी चंदा कोचर यांना ईडी अधिकाऱ्यांसमोर ३ मे रोजी हजर राहण्यासाठी समन्स बजाविण्यात आले होते.