पश्चिम बंगालमध्ये २३ एप्रिल रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापूर्वी ईडीने मोठी कारवाई केली आहे. एजन्सीच्या कोलकाता झोनल कार्यालयाने शहरात ८ ठिकाणांवर छापे टाकले. ही कारवाई बिस्वजीत पोद्दार ऊर्फ 'सोना पप्पू', जय एस. कमदार आणि इतरांविरुद्ध सुरू असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात करण्यात आली आहे.
या छापेमारी दरम्यान ED ने तब्बल १.४७ कोटी रुपये रोख, ६७.६४ लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, अनेक महत्त्वाची कागदपत्रं आणि डिजिटल उपकरणं जप्त केली आहेत. या कारवाईत ED ने एक 'फॉर्च्युनर' कार देखील जप्त केली असून, ही कार बिस्वजीत पोद्दार ऊर्फ सोना पप्पू वापरत होता.
घरात आढळले 'Made in USA' रिव्हॉल्व्हर
एजन्सीला सोना पप्पूच्या कोलकात्यातील फर्न रोड येथील निवासस्थानातून 'Made in USA' असं लिहिलेलं एक रिव्हॉल्व्हर देखील सापडलं आहे. हे शस्त्र पुढील कारवाईसाठी पश्चिम बंगाल पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलं. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निष्पक्ष आणि भयमुक्त वातावरण सुनिश्चित करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं ED ने म्हटलं आहे.
ED ने ही चौकशी पश्चिम बंगाल पोलीस आणि कोलकाता पोलीस यांनी नोंदवलेल्या अनेक एफआयआरच्या (FIR) आधारे सुरू केली होती. या प्रकरणांमध्ये आरोपींवर दंगल घडवणं, हत्येचा प्रयत्न, गुन्हेगारी कट रचणं आणि आर्म्स एक्टचं उल्लंघन करणं यांसारखे गंभीर आरोप आहेत.
बिस्वजीत पोद्दार अद्याप फरार
तपासात असं समोर आलं आहे की, बिस्वजीत पोद्दार ऊर्फ सोना पप्पू आणि त्याचे सहकारी पश्चिम बंगालमध्ये संघटित गुन्हेगारी सिंडिकेट चालवून अवैध मार्गाने मोठी रक्कम गोळा करत होते. कोलकाता येथील गोलपार्कजवळील कांकुलिया रोडवर झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणातही तो हवा आहे आणि सध्या तो फरार असल्याचं सांगण्यात येत आहे.
ED ने समन्स बजावूनही तो अद्याप तपासात सामील झालेला नाही. PMLA अंतर्गत सुरू असलेल्या तपासात असा खुलासा झाला आहे की, आरोपींनी खंडणी, रिअल इस्टेटवर ताबा मिळवणे आणि बेकायदेशीर बांधकाम यांसारख्या कामातून काळा पैसा कमावला होता.
Web Summary : Ahead of West Bengal elections, ED raided Kolkata, seizing ₹1.47 crore cash, gold, documents, and a car. A 'Made in USA' revolver was found. The raid targets money laundering related to Biswajit Poddar, wanted for violence and extortion.
Web Summary : पश्चिम बंगाल चुनाव से पहले, ED ने कोलकाता में छापा मारा, ₹1.47 करोड़ नकद, सोना, दस्तावेज और एक कार जब्त की। 'मेड इन यूएसए' रिवॉल्वर बरामद। छापा बिस्वजीत पोद्दार से जुड़े मनी लॉन्ड्रिंग पर केंद्रित है, जो हिंसा और वसूली के लिए वांछित है।