शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सोनिया गांधी यांची तीन दिवसांत १२ तास ईडी चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 09:26 IST

नवे समन्स नाही; लवकरच आरोपपत्र दाखल करणार

आदेश रावलनवी दिल्ली : नॅशनल हेरॉल्ड मनी लाँडरिंगप्रकरणी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची ईडी अधिकाऱ्यांनी तिसऱ्या दिवशी, बुधवारी तीन तास चौकशी केली. त्यावेळी ईडी कार्यालयात प्रियांका गांधीही उपस्थित होत्या पण त्या वेगळ्या  दालनात होत्या. त्यांची एकूण १२ तास चौकशी झाली आहे. इडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांची चौकशी पूर्ण झाली असून लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.

सोनिया गांधी बुधवारी सकाळी ११ वाजताa ईडी कार्यालयात हजर झाल्या. त्यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी होते. सोनियांच्या चौकशीस सव्वा अकरा वाजता सुरुवात झाली. त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास त्या ईडीच्या कार्यालयातून घरी रवाना झाल्या. यापूर्वी दोन दिवसांत त्यांना ६५ ते ७० प्रश्न विचारण्यात आले होते. त्यांना बुधवारी आणखी ३०-४० प्रश्न विचारण्यात आल्याचे कळते. दरम्यान, नवी दिल्लीतील विजय चौकात निदर्शने करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

एक प्रश्न ठरणार अडचणीचाईडीच्या सूत्रांनी सांगितले की, एका प्रश्नाचे उत्तर देणे हे सोनिया गांधी व राहुल गांधी यांना कठीण जाणार आहे. यंग इंडिया कंपनीने ५० लाख रुपये काँग्रेस पक्षाला दिले. त्याबदल्यात एजेएल कंपनीचे ९० कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले. यंग इंडिया कंपनीचे एकूण भांडवल ५ लाख रुपये होते. मग या कंपनीने ५० लाख रुपये कुठून आणले हा तो अडचणीत आणणारा प्रश्न आहे. 

निदर्शने करणाऱ्यांना घेतले ताब्यातईडीसारख्या यंत्रणांचा होत असलेला गैरवापर तसेच संसदेच्या दोन्ही सभागृहांतून विरोधी सदस्यांचे केलेले निलंबन या गोष्टींविरोधात दिल्लीत काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांनी बुधवारी धरणे धरले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. राहुल गांधी हेही आंदोलनात सहभागी होण्यासाठी संसद भवनात पोहोचले. ते गाडीतून उतरले व तितक्यात त्यांना दूरध्वनी आला. त्यामुळे ते तिथून परत निघाले.

मनोधैर्य खच्ची करण्याचा डाव : खरगेकाँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी ईडीमार्फत चौकशीचा ससेमिरा मागे लावण्यात येत असल्याचा आरोप राज्यसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. खरगे म्हणाले, सोनिया गांधी यांची प्रकृती ठीक नाही. तरीही त्यांना ईडीचे अधिकारी वारंवार चौकशीसाठी बोलावत आहेत. पक्षाला बदनाम करण्याचा हा डाव आहे.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयSonia Gandhiसोनिया गांधीCrime Newsगुन्हेगारी