शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

ईडीचा चौकशीचा ससेमिरा कायम; पुन्हा प्रफुल पटेल रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 18:16 IST

इकबाल मिर्ची मालमत्ता घोटाळा : प्रफुल पटेलांना ईडीची नोटीस

ठळक मुद्देप्रफुल पटेलांना ईडीची नोटीस; १८ ऑक्टोबरला होणार चौकशी मिर्चीच्या मालमत्ता विक्री व्यवहारात कसलाही संबंध नसल्याचा दावा प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.मिर्चीच्या मालकीच्या सीजे हाऊसमधील दोन फ्लॅट पटेल यांनी विकत घेतली असल्याचा अधिकाऱ्यांचा संशय आहे.

मुंबई -  मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यानंतर अंमलबाजवणी संचालनालयाकडून (ईडी) लवकरच आणखी एका राजकीय नेत्याला चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे. माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना १८ ऑक्टोबरला चौकशीला हजर रहाण्याबाबत नोटीस ईडीने बजावली आहे. मृत गँगस्टर इकबाल मिर्ची यांच्या मालमत्ता विक्री प्रकरणात त्यांच्याकडे चौकशी करण्यात येणार असल्याचे ईडीतील सुत्रांकडून सांगण्यात आले.मिर्चीच्या मालकीच्या सीजे हाऊसमधील दोन फ्लॅट पटेल यांनी विकत घेतली असल्याचा अधिकाऱ्यांचा संशय आहे. याप्रकरणात अटक केलेल्या या रणजित सिंग बिंद्रा व हारुण युसूफ या दलालाच्या चौकशीतून पुढे आली आहे. याबाबत पटेल यांची चौकशी केली जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, प्रफुल्ल पटेल व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी या प्रकरणाचा इन्कार करत जाणीवपूर्वक या प्रकरणात गोवले जात असल्याचा आरोप केला आहे. मिर्चीच्या मुंबईतील कोट्यावधीच्या मालमत्तेच्या विक्रीच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने दिल्लीतून रणजित सिंग बिंद्रा व हारुण अलीम युसूफ यांना गेल्या शुक्रवारी अटक केली आहे. त्याच्याकडील चौकशीतून दाऊद इब्राहिमच्या देशातील व ब्रिटनमधील संपत्तीबाबतची महत्वपूर्ण माहिती मिळाली असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.अंडर वर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या इकबाल मिर्चीचे फरारी असताना २०१३ मध्ये लंडनमध्ये निधन झाले आहे. त्याने १९८६ मध्ये मोहम्मद युसुफ ट्रस्टच्या वरळी येथील तीन मालमत्ता साडे सहा लाखांना विकत घेतली होती. त्याच्या मृत्यूनंतर ही मालमत्ता सुमारे २०० कोटींना विकण्यात आली आहे. या व्यवहारामध्ये सन्बिक रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्यावतीने रणजित सिंग बिंद्रा व हारुण युसूफ याने दलाली केली होती. त्यांच्या चौकशीमध्ये माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्याकडे सीजे हाऊसच्या तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर दोन फ्लॅट आहेत. २००७ मध्ये त्याच्या विकास करार होवून हस्तांतर करण्यात आले. पटेल यांचे त्या व्यवहारावर सहमालक म्हणून स्वाक्षरी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली जाईल. दरम्यान, मिर्चीच्या मालमत्ता विक्री व्यवहारात कसलाही संबंध नसल्याचा दावा प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

टॅग्स :Praful Patelप्रफुल्ल पटेलEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयDawood Ibrahimदाऊद इब्राहिमMumbaiमुंबई