शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला दणका! ईडीने वांद्रे येथील १६.३८ कोटींच्या संपत्तीवर आणली टाच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 16:58 IST

मनी लाँड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याचे ईडीने म्हटले आहे. ही कारवाई म्हणजे काँग्रेस पक्षाला हा धक्का बसण्यासारखी आहे.

ठळक मुद्दे ईडीने सांगितले की, जप्त केलेली संपत्ती ही वांद्रे येथे एक नऊ मजली इमारत आहे. एजेएल आणि मोतीलाल वोरा यांच्या नावे पीएमएलएअंतर्गत तात्पुरती अटॅचमेंट ऑर्डर जारी करण्यात आले आहेत.यात सोनिया आणि राहुल गांधी यांच्यासह  मोतीलाल वोरा, सुमन दुबे, ऑस्कर फर्नांडिस आणि सॅम पित्रोदा आहेत.

मुंबई - असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) आणि काँग्रेस पक्षाचे नेते मोतीलाल वोरा यांच्या 16.38 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश जारी केल्याचे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शनिवारी सांगितले. मनी लाँड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याचे ईडीने म्हटले आहे. ही कारवाई म्हणजे काँग्रेस पक्षाला हा धक्का बसण्यासारखी आहे.ईडीने सांगितले की, जप्त केलेली संपत्ती ही वांद्रे येथे एक नऊ मजली इमारत आहे. या इमारतीत दोन तळघर आहेत. ते १५ हजार चौरस मीटरचे आहेत. एजेएल आणि मोतीलाल वोरा यांच्या नावे पीएमएलएअंतर्गत तात्पुरती अटॅचमेंट ऑर्डर जारी करण्यात आले आहेत.वोरा एजेएलचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. एजेएलचे नियंत्रण काँग्रेसचे वरिष्ठ नेते करतात. यात गांधी कुटुंबातील सदस्यांचा देखील समावेश आहे. नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र हा समूह चालवितो. जवाहरलाल नेहरू यांनी १९३८ मध्ये नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राची स्थापना केली. तेव्हापासून ते काँग्रेसचे मुखपत्र मानले जाते.

पहिले वृत्तपत्र एजेएलच्या मालकीचे होते. तथापि, स्वातंत्र्यानंतर १९५६ मध्ये एजेएल एक अव्यावसायिक कंपनी म्हणून स्थापन झाली. २००६ मध्ये त्याची सर्व प्रकाशने स्थगित केली गेली आणि कंपनीवर ९० कोटी रुपयांचे कर्ज झाले. यानंतर, काँग्रेसच्या नेतृत्वात 'यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड' नावाची एक नवीन व्यावसायिक कंपनी स्थापन केली. यात सोनिया आणि राहुल गांधी यांच्यासह  मोतीलाल वोरा, सुमन दुबे, ऑस्कर फर्नांडिस आणि सॅम पित्रोदा आहेत.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयcongressकाँग्रेस