शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

ईडीची पीडा तूर्तास टळली; सुप्रीम कोर्टाकडून चिदंबरम यांना दिलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 16:06 IST

सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट उद्या सुनावणी घेणार आहे. 

ठळक मुद्देआज सुप्रीम कोर्टाने चिदंबरम यांना तूर्तास अटकेपासून अंतरिम सरंक्षणाची मुदत वाढवली आहे. प्रकरणात ‘ईडी’कडून होणारी संभाव्य अटक टाळण्यासाठी चिदंबरम यांनी केलेल्या अपिलावरील सुनावणी आज पार पडली

नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाकडून माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) चौकशीपासून आज तूर्तास दिलासा मिळाला आहे. आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी ईडीला चौकशीसाठी चिदंबरम यांना तूर्तास अटक करता येणार नाही. कारण आज सुप्रीम कोर्टाने चिदंबरम यांना तूर्तास अटकेपासून अंतरिम सरंक्षणाची मुदत वाढवली आहे. दिल्ली हायकोर्टाने चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्याविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट उद्या सुनावणी घेणार आहे. 

आयएनएक्स मीडिया कंपनीत ३०५ कोटी रुपयांच्या परकीय गुंवणुकीस १२ वर्षांपूर्वी लाच खाऊन गैरमार्गाने मंजुरी दिल्याच्या आरोपावरून सीबीआयच्या अटकेत असलेल्या माजी केंद्रीय वित्तमंत्री पी.चिदंबरम यांना कालच आणखी चार दिवस ‘सीबाआय’ कोठडीत ठेवण्याचा आदेश येथील विशेष न्यायालयाने दिला. मात्र, याच प्रकरणात ‘ईडी’कडून होणारी संभाव्य अटक टाळण्यासाठी चिदंबरम यांनी केलेल्या अपिलावरील सुनावणी आज पार पडली असून तूर्तास त्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या बुधवारी या दोन्ही प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर सीबीआयने चिदंबरम यांना रात्री त्यांच्या निवासस्थानी अटक केली होती. दुसऱ्या दिवशी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अजय कुमार कुहार यांनी त्यांना पाच दिवसांची कोठडी दिली होती. ती मुदत संपल्यावर सीबीआयने सोमवारी पुन्हा चिदंबरम यांना न्यायालयापुढे हजर करून आणखी पाच दिवसांच्या कोठडीसाठी अर्ज केला. त्यावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश कुहार यांनी आणखी चार दिवसांच्या कोठडीचा आदेश काल दिला. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयP. Chidambaramपी. चिदंबरमCourtन्यायालयArrestअटकEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय