शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

खाऊ आणि पळून जाऊ! फाइव्ह स्टार हॉटेलच्या जेवणावर फुकटात ताव मारणाऱ्या बाप-लेकास बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 16:08 IST

या बाप- लेकाने आतापर्यंत मुंबईतील नामांकित पंचतारांकित हॉटेलांना हजारो रुपयांचा गंडा घातला आहे. सुहास नेर्लेकर(५७) आणि स्वप्नील नेर्लेकर(३२) असं या ठग बाप लेकाचं नाव आहे.    

ठळक मुद्देबिल न भरता पळून जाणाऱ्या बाप - लेकास 'व्हिवान्ता प्रेसिडेंट' हॉटेलमध्ये अटक करण्यात आली आहे सुहास नेर्लेकर(५७) आणि स्वप्नील नेर्लेकर(३२) असं या ठग बाप लेकाचं नाव आहे.    अटक करण्यात आलेले दोघंही कांदिवलीचे रहिवासी आहेत.

मुंबई - अगदी सिनेमात घडावं तसं मुंबईतील कप परेड येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये घडली आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन जेवणावर ताव मारून हजारो रुपयांचे बिल न भरता पळून जाणाऱ्या बाप - लेकास 'व्हिवान्ता प्रेसिडेंट' हॉटेलमध्ये अटक करण्यात आली आहे. या बाप- लेकाने आतापर्यंत मुंबईतील नामांकित पंचतारांकित हॉटेलांना हजारो रुपयांचा गंडा घातला आहे. सुहास नेर्लेकर(५७) आणि स्वप्नील नेर्लेकर(३२) असं या ठग बाप लेकाचं नाव आहे.    अटक करण्यात आलेले दोघंही कांदिवलीचे रहिवासी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघंही मोठे व्याापारी असल्याची बतावणी करून पंचतारांकित हॉटेलमध्ये फोन करून रूम बुक करतात. पंचतारांकित हॉटेलला जाण्यासाठी संबंधित हॉटेलमधून कार मागवायचे आणि हॉटेलमध्ये पोहोचताच चेक इन करण्याची वेळ आली की आम्ही थकलो आहोत अशी सबब द्यायचे. आधी जेवतो मग चेक इन करतो असं सांगून हॉटेलच्या डायनिंग रुममध्ये शिरायचे. हजारो रुपयांचं जेवण फस्त करायचे. सुरक्षा रक्षकांच्या तोंडाला पानं पुसून हॉटेलमधून पसार व्हायचे. या दोघांनी ताज ग्रुपच्या मुंबईतील अनेक हॉटेल्सची हजारो रुपयांची जेवणाची बिलं बुडवली. कुलाब्याच्या ताज हॉटेलला देखील या दोघांनी तब्बल ३२ हजार रुपयांचा चुना लावला होता. ताज ग्रुपच्या इतर हॉटेल्सची या दोघांनी फसवणूक केली असल्यामुळे 'व्हिवान्ता प्रेसिंडेट' हॉटेलच्या मॅनेजमेंटला ठगसेन बाप - लेकाबाबत अगोदरच कल्पना होती. शनिवारी या दोघांचे हॉटेलमध्ये आल्यापासूनच मॅनेजमेंटची त्यांच्यावर बारकाईने नजर होती. या दोघांच्या जेवणाचे बिल तब्बल ८ हजार ८८० रुपये झाले. जेवल्यानंतर दोघंही हॉटेलमधून पळून जात असताना त्यांना एका वेटरने अडवले आणि बिलचे पैसे मागितले. वेटरचं लक्ष विचलित करण्यास ते अयशस्वी झाले. अखेर त्या दोघांनी पैसे नसल्याची कबुली दिली. नंतर मॅनेजमेंटने दोघांना तात्काळ कफ परेड पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी नेर्लेकर बाप - लेकावर कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचाही शोध घेण्यात येतो आहे. इतर ताज ग्रुपच्या हॉटेल्सने देखील या दोघांविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत.   

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhotelहॉटेलArrestअटकPoliceपोलिसfraudधोकेबाजीfoodअन्न