शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

बनावट आयडीच्या आधारे ई-तिकीट घोटाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 19:26 IST

सदर दोघे बनावट आयडीच्या आधारे सायबर कॅफेच्या माध्यमातून रेल्वेच्या विविध गाडयांचे ई-तिकिट काढत होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सांगली येथील एका सायबर कॅफेवर नजर ठेवली होती.

ठळक मुद्देआरपीएफकडून दोन जणांना अटक,  ६२ हजार रुपयांची तिकिट जप्त

पुणे : बनावट ईमेल आयडीच्या आधारे रेल्वेच्या संगणक प्रणाली (ई-तिकिट)द्वारे रेल्वेच्या विविध ठिकाणी धावणा-या एक्सप्रेस गाड्यांचे आरक्षित तिकिट काढून घोटाळा करणा-या सांगली येथील दोघांना रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) पथकाने अटक केली आहे.    मंजित बाबासाहेब पाटील (वय ३७, रा. सांगली), गजानन काडप्पा गोंधळी (वय २९, रा. हरिपुर, ता.मिरज, सांगली) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. सदर दोघे बनावट आयडीच्या आधारे सायबर कॅफेच्या माध्यमातून रेल्वेच्या विविध गाडयांचे ई-तिकिट काढत होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सांगली येथील एका सायबर कॅफेवर नजर ठेवली होती. ११ नोव्हेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास दोघेही संबंधिक कॅफेमध्ये आले व तिकीटांचे प्रिंट घेत असताना पोलिसांनी त्यांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून पुढील तारखेचे दहा तिकिट व मागील ५० असे एकूण  ६२ हजार रुपयांची ६० तिकिट जप्त केले आहेत. तसेच दोन संगणक, दोन मॉनिटर, दोन मोबाइल त्यांच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आले आहे. बनावट आयडीद्वारे ते काही सेंकदाच्या आत रेल्वेचे आरक्षण सुरू झाल्यावर काढत असल्याचे दिसून आले आहे. रजिस्टर आयडी व पासवर्डच्या माध्यमातून आरोपींनी कशाप्रकारे बनावट आयडीद्वारे तिकिटे काढली व त्यांचे आणखी अन्य साथीदार आहेत का याबाबत पोलीस तपास करत आहे. आरोपींकडे अजून काही बनावट ईमेल आयडी मिळून येण्याची शक्यता असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून त्यादृष्टीने अधिक तपास आरोपींकडे करावयाचा आहे. सोमवारी त्यांना रेल्वेच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी समोर हजर करण्यात आले होते. त्यावेळी सरकारी वकील वामन कोळी यांनी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. ही मागणी मान्य करीत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गजानन नंदनवार यांनी त्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :Puneपुणेcyber crimeसायबर क्राइमticketतिकिटPoliceपोलिस