शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

कार तपासणीदरम्यान पोलीस झाले अवाक् सापडलं कोटींचं घबाड, तीन तरुण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 13:26 IST

Crore of notes Seized : जप्त करण्यात आलेल्या सर्व नोटा 500 आणि 2000 रुपयांच्या आहेत.

बिहारच्या गोपालगंजमध्ये एका कारमधून करोडोंची रोकड जप्त करण्यात आली आहे. फुलवारिया पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी श्रीपूरजवळ वाहन तपासणीदरम्यान कारमधून कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.पोलिसांनी कारमधील तिघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. हथुआ एसडीपीओ नरेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली कारमधून जप्त करण्यात आलेल्या नोटांची मोजणी केली असता त्या 1 कोटी 48 लाख 99 हजार 500 रुपयांच्या निघाल्या. जप्त करण्यात आलेल्या सर्व नोटा 500 आणि 2000 रुपयांच्या आहेत.एसडीपीओ नरेश कुमार यांनी सांगितले की, फुलवारिया पोलिस स्टेशन हद्दीतील श्रीपूरजवळ पोलिस वाहनांची तपासणी करत होते. यादरम्यान उत्तर प्रदेशकडून येणारी एक कार थांबवून तिची तपासणी केली असता कारच्या ट्रंकमधून घबाड सापडले. जप्त केलेली रक्कम पोलिस ठाण्यात आणण्यात आली आणि तेथे नोट मोजण्याचे यंत्र मागवून त्याची मोजणी करण्यात आली. पुढे ते म्हणाले की, अटक करण्यात आलेल्या तीन तरुणांनी चौकशीदरम्यान सांगितले की, ते ही रक्कम यूपीतील खलीलाबाद येथून छप्रा येथे घेऊन जात होते. एका तरुणाने हे पैसे व्यावसायिकाशी संबंधित असल्याचे सांगितले, त्यानंतर आयकर विभागाच्या टीमला पाचारण करण्यात आले.

तिन्ही तरुण दिशाभूल करत आहेतएसडीपीओ म्हणाले की, तपासानंतर सोमवारी या प्रकरणाचा खुलासा केला जाईल. मात्र, गाडीतून नोटांचे बंडल सापडल्यानंतर परिसरात विविध चर्चा सुरू आहेत. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा यूपीमधील विधानसभा निवडणूक, हवाला व्यवसाय आणि सायबर क्राईमशी संबंध जोडून तपास करत आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान हे तिघे तरुण जप्त केलेल्या रकमेबाबत वेगवेगळ्या गोष्टी सांगून दिशाभूल करत आहेत. कोलकाता येथील अंकित साव, जलालपूर येथील पृथ्वी कुमार आणि छपरा येथील मसरख येथील अनूप कुमार तिवारी अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशArrestअटकcarकार