औरंगाबाद आणि गंगाखेडमध्ये शंभरच्या बनावट नोटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 22:13 IST2021-05-24T22:12:11+5:302021-05-24T22:13:41+5:30
रिझर्व बँकेतून खुलासा : पोलिसात गुन्हा दाखल

औरंगाबाद आणि गंगाखेडमध्ये शंभरच्या बनावट नोटा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : औरंगाबाद आणि गंगाखेड मधील विविध बँकेच्या शाखेत शंभराच्या बनावट बनावट नोटा जमा करण्यात आल्या आहेत. रिझर्व बँकेत या बनावट नोटा पोहोचल्यानंतर आज त्याचा खुलासा झाला. त्यामुळे सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
बँक अधिकारी रोहिनी टिपले यांनी सदर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, औरंगाबाद आणि गंगाखेड येथील वेगवेगळ्या बँकेच्या शाखेत १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०१२१ दरम्यान शंभरच्या तब्बल २८ बनावट नोटा अज्ञात आरोपींनी जमा केल्या.
बँक व्यवस्थापनाच्या ते लक्षात आल्यानंतर या बनावट नोटा आरबीआयच्या नागपूर शाखेत पाठविण्यात आल्या. येथे कार्यालयीन चौकशी प्रक्रिया पार पडल्यानंतर बँकेतर्फे रोहिणी टिपले यांनी आज सदर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी भादंविचे कलम ४८९ (ब) अन्वये गुन्हा नोंदविला. पुढील तपास सुरू आहे.