मुंबई - टीव्हीवरील मालिकांमध्ये काम देतो अशी बतावणी करून ७० ते ७५ नवकलाकारांची फसवणूक करण्यात आली आहे. सिंटा प्रा. लि.चे पदाधिकारी असल्याचे भासवून या भामट्यांनी या नवकलाकारांकडून ईमेलद्वारे बनावट करारनामे पाठवून त्यांच्याकडून नेटबँकिंग आणि पेटीएमद्वारे पैसे स्वीकारले होते. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ने अविनाश शर्मा (२४) आणि विनोद भंडारी (३०) या दोन आरोपींना अटक केली आहे. अविनाश शर्मा हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. या दोघांनी आदित्य व श्रुती जैन नावाचा वापर करून संगमताने सिने कलाकारांच्या सिंटा प्रा. लि.चे पदाधिकारी असल्याचे भासवून नवकलाकारांना स्टार टीव्हीनिर्मित कृष्ण चली लंडन व इतर मालिकांमध्ये भूमिका देण्याची बतावणी केली. या भूमिकेसाठी निवड झाल्याचे भासविण्यासाठी बनावट करारनामे ईमेलद्वारे पाठवून त्यांच्याकडून नेटबँकिंग व पेटीएमद्वारे पैसे स्वीकारले. मात्र, पैसे स्वीकारल्यानंतर मालिकेत भूमिका न दिल्याने कलाकारांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर कक्ष ९ ने ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या.
टीव्ही मालिकांमध्ये काम देतो सांगून ७५ नवकलाकारांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 22:13 IST
सिंटा प्रा. लि.चे पदाधिकारी असल्याचे भासवून या भामट्यांनी या नवकलाकारांकडून ईमेलद्वारे बनावट करारनामे पाठवून त्यांच्याकडून नेटबँकिंग आणि पेटीएमद्वारे पैसे स्वीकारले होते. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ने अविनाश शर्मा (२४) आणि विनोद भंडारी (३०) या दोन आरोपींना अटक केली आहे.
टीव्ही मालिकांमध्ये काम देतो सांगून ७५ नवकलाकारांची फसवणूक
ठळक मुद्दे ७० ते ७५ नवकलाकारांची फसवणूक करण्यात आली आहे.याप्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ने अविनाश शर्मा (२४) आणि विनोद भंडारी (३०) या दोन आरोपींना अटक केली आहे.