शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक चालकांना मारहाण करुन त्यांना लुटणाऱ्या दुकलीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 22:27 IST

दोघांनाही कासारवडवली पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली आहे.

ठळक मुद्दे दोघांनाही 14 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.त्यांच्याकडून चोरीतील रोकड, ट्रेलरची चावी आणि चालक परवाना असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ठाणे - मोटारसायकलवरुन येऊन ट्रक चालकांना मारहाण करुन त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे आणि इतर साहित्याची चोरी करुन पळून जाणाऱ्या शंकर खरात (24, रा. ठाणे) आणि आकाश वीर (21, रा. ठाणो) या दोघांनाही कासारवडवली पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली आहे.

त्यांच्याकडून चोरीतील रोकड, ट्रेलरची चावी आणि चालक परवाना असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाणो परिसरामध्ये परराज्यातून येणाऱ्या ट्रक आणि ट्रेलरच्या चालकांना मारहाण करुन त्यांच्याकडून रोकड, मोबाइल फोन जबरदस्तीने काढून घेण्याचे प्रकार सुरु होते. अशा प्रकारांवर आळा घालण्याचे आदेश देत यातील आरोपींना जेरबंद करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले होते. याच पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एस. बी. जाधव, उपनिरीक्षक के. व्ही. मोरे तसेच पोलीस हवालदार राजेंद्र चौधरी, अंकुश पाटील, सुजित खरात, पोलीस नाईक विश्वनाथ धुर्वे, विजय जाधव आणि राजकुमार महापुरे आदींचे पथक 6 ऑक्टोंबर रोजी नागलाबंदर, आनंदनगर भागात पेट्रोलिंग करीत होते. तेंव्हा एका मोटारसायकलवरुन आलेले दोघेजण संशयास्पदरित्या वावरताना या पथकाला आढळले. त्यांना या पथकाने हटकले असता, हे दोघेही तिथून पळाले. त्यानंतर त्यांचा पाठलाग करुन शंकर आणि आकाश या दोघांनाही ठाणे महापालिकेच्या इमारतीजवळ पकडण्यात आले. त्यांनी कासारवडवली परिसरामध्ये केलेल्या एका जबरी चोरीची कबूली दिली. त्यानंतर त्यांना या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली. दोघांनाही 14 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

अशी करायचे लुटमारहे दोघेही परराज्यातून आलेल्या मोठया वाहनांसमोर जाणीवपूर्वक त्यांची दुचाकी ओव्हरटेक करीत असत. जबरदस्तीने वाहन थांबविण्यास भाग पाडून ट्रक चालकांकडून मोटरसायकलस्वार यांना धक्का लागून खाली पडून मोटारसायकलीचे नुकसान झाल्याची बनाव करीत असत. त्यानंतर वाहन चालकाला मारहाण करुन त्यांच्याकडील रक्कम, मोबाईल तसेच किंमतीऐवज जबरदस्तीने काढून लुटमार करुन पलायन करीत होते. त्यांनी अशा प्रकारे अनेक गुन्हे केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसthaneठाणेbikeबाईकRobberyचोरी