एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून कोयत्याने वार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 04:09 PM2019-08-02T16:09:28+5:302019-08-02T16:14:12+5:30

काळेवाडीतील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होेते..

due to saw with get together at the reason of looking at each other | एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून कोयत्याने वार 

एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून कोयत्याने वार 

Next

पिंपरी : तरुणाकडे बघितल्याच्या कारणावरून कोयत्याने डोक्यात मारून तसेच मारहाण करून जखमी केले. काळेवाडी येथे बुधवारी (दि. ३१) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगदीश नढे (रा. काळेवाडी) असे आरोपीचे नाव आहे. नढे याच्या मित्रांवरही गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी राहुल अशोक घोडेश्वार (वय ३०, रा. काशिबा शिंदे सभागृहाजवळ, पिंपरी) याने फिर्याद दिली आहे. 
फिर्यादी राहुल त्यांचे दाजी विजय बानायत यांच्यासोबत बुधवारी काळेवाडीतील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होेते. त्यावेळी आरोपी जगदीश याच्याकडे पाहिल्याच्या कारणावरून त्याने राहुल याला शिवीगाळ केली. डोक्यात कोयत्याने मारून जखमी करून राहुल याला खाली पाडले. त्यावेळी जगदीश याच्या मित्रांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात राहुल याच्या डोक्याला जबर जखम झाली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: due to saw with get together at the reason of looking at each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.