शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या सतर्कतेमुळे पवईत ब्रिटिश नागरिकाचा वाचला जीव  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 17:08 IST

ब्रिटिश नागरिकाचे दिड तास मन परिवर्तन करून आत्महत्येपासून परावृत्त केले. 

ठळक मुद्देपवई येथील हिरानंदानी परिसरातील टोरानो इमारतीच्या २१ व्या मजल्यावरून ब्रिटिश नागरिक आत्महत्येचा प्रयत्न करत आहे.याबाबत माहिती मिळताच पवई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सॅम हे अमेरिकन कंपनीत काम करत असून त्याचे कार्यालय अंधेरी पूर्वेकडे आहे.

मुंबई - मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका ब्रिटिश नागरिकाचा जीव वाचला आहे. २७ जून रोजी सकाळच्या सुमारास पवई पोलिसांना मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षातून कॉल प्राप्त झाला की, पवई येथील हिरानंदानी परिसरातील टोरानो इमारतीच्या २१ व्या मजल्यावरून ब्रिटिश नागरिक आत्महत्येचा प्रयत्न करत आहे. याबाबत माहिती मिळताच पवई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ब्रिटिश नागरिकाचे दिड तास मन परिवर्तन करून आत्महत्येपासून परावृत्त केले. या ब्रिटिश नागरिकाचे नाव सॅम कॉलर्ड (६१) असं आहे. 

नियंत्रण कक्षातून मिळालेल्या माहितीनुसार पवई पोलीस तोरानो इमारतीजवळ पोचले असता पोलिसांनी तोरानो इमारतीशेजारी असलेल्या अवलॉन इमारतीच्या ३३ व्य मजल्यावर जाऊन सॅम यांचे स्थळ ट्रेस केले. मात्र, घर आतून लॉक होत असून खूप विनवण्या केल्यानंतर ब्रिटिश नागरिक असलेल्या सॅम यांनी दरवाजा उघडला. ते एकटेच राहत होते. त्यांना पॅरालिसिसचा झटका येऊन गेला होता. सॅम हे अमेरिकन कंपनीत काम करत असून त्याचे कार्यालय अंधेरी पूर्वेकडे आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियातील सिडनीत राहणाऱ्या आपल्या पत्नीस सॅमने आत्महत्या करणार असल्याची पूर्वकल्पना दिली होती. त्यानंतर पत्नीने याबाबतची माहिती बीकेसी येथील ब्रिटिश डाय हाय कमिशन यांना दिली. त्यांनी ही माहिती मुंबई पोलीस नियंत्रण कक्षास दिली होती. त्यानंतर नियंत्रण कक्षाने ही माहिती संबंधित पवई पोलिसांना दिली आणि ब्रिटिश नागरिकाचे प्राण वाचविले. ६१ वर्षीय सॅम अगोदर पवई पोलिसांवर भडकले होते. पोलिसांनी शांतपणे समजावून सांगितले आणि दिड तास समुपदेशन केल्यानंतर पोलिसांच्या गाडीत बसून रुग्णालयात येण्यास तयार झाले. दरम्यान,पोलिसांनी त्यांना उपचारासाठी हिरानंदानी रुग्णालयात दाखल केले. 

 

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसAmericaअमेरिकाAustraliaआॅस्ट्रेलिया