शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

येऊरच्या खदाणीत साठलेल्या पाण्यात रहिवाशाचा बुडून मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 19:32 IST

त्यांनी आत्महत्या की पोहताना बुडून त्यांचा मृत्यू झाला या सर्व बाबींचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

ठळक मुद्देलोकमान्य नगर भागात राहणारे तांडेल हे बुधवारी सायंकाळी घराबाहेर पडले होते.गुरुवारी दुपारी ३. ३० वाजण्याच्या सुमारास येऊरच्या खदाणीमध्ये एक मृतदेह आढळल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाली तांडेल हे खदाणीत पोहण्यासाठी उतरले असावेत त्यातच त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची शक्यताही पोलिसांनी वर्तविली आहे.

 

ठाणे -  येऊर येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरातील हवाई दलाच्या केंद्राजवळील खदाणीत साठलेल्या पाण्यात  गुरुवारी गोपाळ तांडेल (50) यांचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तांडेल यांचा खून झाला की त्यांनी आत्महत्या की पोहताना बुडून त्यांचा मृत्यू झाला या सर्व बाबींचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. लोकमान्य नगर भागात राहणारे तांडेल हे बुधवारी सायंकाळी घराबाहेर पडले होते. ते घरी परतलेच नाही. गुरुवारी दुपारी ३. ३० वाजण्याच्या सुमारास येऊरच्या खदाणीमध्ये एक मृतदेह आढळल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाली. त्याआधारे ठाणे अग्निशमन दल आणि पोलिसांनी या खदाणीमधून तांडेल यांचा मृतदेह बाहेर काढला.  त्यांच्या अंगावर कोणत्याही जखमा आढळल्या नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तांडेल हे खदाणीत पोहण्यासाठी उतरले असावेत त्यातच त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची शक्यताही पोलिसांनी वर्तविली आहे. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांनी सांगितले.  

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेDeathमृत्यूPoliceपोलिस