जादूटोण्याच्या संशयावरून 6 जणांचे काढले दात अन्...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 15:29 IST2019-10-03T15:26:25+5:302019-10-03T15:29:25+5:30

या प्रकरणात २९ लोकांना अटक करण्यात आली आहे.

Due to doubt of blackmagic removed teeth of 6 person | जादूटोण्याच्या संशयावरून 6 जणांचे काढले दात अन्...

जादूटोण्याच्या संशयावरून 6 जणांचे काढले दात अन्...

ठळक मुद्देओडिशातील गंजम जिल्ह्यात ही संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी २२ महिलांसह २९ आरोपींना जेरबंद केले आहे. ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातील गोपापूर गावात हे अमानवी क्रूर कृत्य घडलं आहे.

ओडिशा - जोदूटोणा केल्याच्या संशयातून ६ जणांचे दात काढल्याचा आणि त्यांना जबरदस्तीने मानवी विष्ठा खायला घातल्याचा धक्कादायक असा अघोरी प्रकार समोर आला आहे. ओडिशातील गंजम जिल्ह्यात ही संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी २९ आरोपींना पोलिसांनीअटक करण्यात आली आहे. 
ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातील गोपापूर गावात हे अमानवी क्रूर कृत्य घडलं आहे. जादूटोण्याच्या संशयातून ६ पुरुषांना त्यांच्या घरातून जबरदस्तीने बाहेर काढत त्यांच्या जबड्यातून प्रत्येकी आठ दात काढण्यात आले आणि त्यांना जबरदस्तीने मानवी विष्ठा देखील खायला घालण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी २२ महिलांसह २९ आरोपींना जेरबंद केले आहे. यातील सर्व आरोपी हे ६० वर्षांवरील आहेत. 
गंजमचे पोलीस अधीक्षक ब्रिजेश राय यांनी सांगितले की, या प्रकरणात २९ लोकांना अटक करण्यात आली आहे. घटना घडलेल्या परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली असून उर्वरित आरोपींनाही अटक केली जाईल. जोगी दास, रामा नाहक, हरी नाहक, सानिया नाहक, जोगेंद्र नाहकांनी जुरिया नाहक अशी पीडितांची नावं असून त्यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

Web Title: Due to doubt of blackmagic removed teeth of 6 person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.