शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित ‘एसीआर’मुळे रखडला पोलीस अधिकाऱ्यांच्या बढतीचा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 19:54 IST

जमीर काझी  मुंबई  गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या निरीक्षक, साहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बढतीचा मार्ग त्यांच्या प्रलंबित वार्षिक गोपनीय अहवालामुळे ...

ठळक मुद्दे२०० वर अधिकाऱ्यांची पदोन्नती आणखी काही काळ लांबणीवर पडली आहे. वारंवार स्मरणपत्रे पाठवूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती ओढावली आहे.

जमीर काझी मुंबई  गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या निरीक्षक, साहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बढतीचा मार्ग त्यांच्या प्रलंबित वार्षिक गोपनीय अहवालामुळे (एसीआर) रखडला आहे. राज्यभरात विविध ठिकाणी नियुक्तीला असलेल्या या अधिकाऱ्यांचे २०१७-१८ या वर्षातील अहवाल घटकप्रमुखांकडून सादर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे २०० वर अधिकाऱ्यांची पदोन्नती आणखी काही काळ लांबणीवर पडली आहे. वारंवार स्मरणपत्रे पाठवूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती ओढावली आहे.पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या अधिकाऱ्यांचे प्रलंबित एसीआर शुक्रवार, ७ जूनपर्यंत कोणत्याही परिस्थितीत मुख्यालयात सादर करावेत, अशी सक्त ताकीद पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांनी सर्व घटकप्रमुखांना दिली आहे. अहवालाची पूर्तता न करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.पोलिसांचीही पदोन्नती ही अन्य शासकीय अधिकाऱ्यांप्रमाणे सेवाज्येष्ठता आणि त्यांच्या कामाचे मूल्यमापन असलेल्या ‘एसीआर’वर अवलंबून असते. अन्य विभागाकडून हे काम बहुतांशवेळा नियमितपणे निर्धारित वेळेत पूर्ण केले जात असले तरी पोलिसांबाबत मात्र यासंदर्भात नेहमीच उदासीनता बाळगली जात असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळेच गेल्या जवळपास सव्वा वर्षापासून उपनिरीक्षक ते निरीक्षक दर्जापर्यंतच्या अधिकाºयांच्या बढत्या रखडल्या आहेत.बढतीसाठी पात्र असलेल्या अधिकाऱ्यांची पदोन्नती ३१ मेपर्यंत करण्याचे नियोजन महासंचालक कार्यालयाकडून करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात त्याबाबत आस्थापना विभागाकडून पडताळणी केली जात असताना अनेक अधिकाऱ्यांचे २०१७-१८ या वर्षातील वार्षिक गोपनीय अहवाल मुख्यालयात सादर झालेले नाहीत. त्याबाबत दोन ते तीनवेळा स्मरणपत्र पाठवूनही दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे सर्व घटकप्रमुखांना आता एसीआर सादर करण्यासाठी अखेरची संधी देण्यात आली आहे.प्रलंबित एसीआर कोणत्याही परिस्थितीत ७ जूनपर्यंत पोलीस मुख्यालयात सादर करावेत, असे आदेश पोलीस महासंचालक सुबोध जायस्वाल यांनी सर्व पोलीस आयुक्त, अधीक्षक व घटकप्रमुखांना केले आहेत. निर्धारित मुदतीमध्ये अहवाल न पाठविल्यास संबंधितावर कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

बढतीच्या प्रतीक्षेत अनेक जण निवृत्तपोलीस साहाय्यक निरीक्षक, निरीक्षक व उपअधीक्षक दर्जाची अनेक पदे रिक्त असतानाही गेल्या वर्षभरापासून या पदावर बढत्या देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे त्यासाठी पात्र असलेल्या अधिकाऱ्यांत अस्वस्थतेचे वातावरण आहे. त्याचप्रमाणे निरीक्षक खात्यातील ३२ ते ३३ वर्षांच्या सेवेनंतर बढतीच्या प्रतीक्षेत अनेक जण ३१ मे रोजी निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी पदोन्नती मिळेल, ही त्यांची इच्छा अपूर्णच राहिली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र