शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

जबीर मोतीच्या अटकेमुळे दाऊदची पोल खोल होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 20:48 IST

जबीरने उद्योगपती प्रमोद गोएंका यांचं मोझाम्बिकामध्ये अपहरण केल्याचं सांगितलं जात आहे.  

मुंबई - कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमचा विश्वासू साथीदार मानला जाणाऱ्या जबीर मोती याला लंडनमध्ये अटक करण्यात आली. त्याच्या अटकेमागे दाऊदचा हात असल्याचा दावा केला जात आहे. दाऊद सध्या खूप आजारी आहे. त्याच्याशी विश्वासघात करण्याची शक्यता असलेल्यांना तो पोलिसांच्या जाळ्यात अडकवून त्यांना अद्दल घडवत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. जबीर हा दाऊदचा अमेरिका आणि इंग्लंडमधील आर्थिक कारभार सांभाळत होता. त्याचे इक्बाल मिर्ची आणि मिर्चीचा लंडनमध्ये राहणारा भाचा आसिफ यांच्याशी घनिष्ट संबंध आहेत. या आसिफच्याच सांगण्यावरून जबीरने उद्योगपती प्रमोद गोएंका यांचं मोझाम्बिकामध्ये अपहरण केल्याचे बोलले जात आहे. जबीरच्या अटकेमुळे दाऊदच्या माहितीसोबतच या अपहरणाचाही उलगडा होण्याची आशा तपास यंत्रणांना आहे.

कुख्यात गुंड दाऊदचा व्यवसाय अमेरिका, इंग्लंडसोबत काही अफ्रिकी देशांत आहे. हा व्यवसाय दाऊदला हळूहळू कमी करायचा आहे. शिल्लक राहणार धंदा कुटुंबातीलच कोणीतरी सांभाळावा अशी त्याची आकांक्षा आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये दाऊदचा भाऊ अनीस इब्राहीमचे वर्चस्व टोळीमध्ये वाढलं आहे. आपला मृत्यू झाला तर आपल्या कुटुंबाला कोणताही धोका नको म्हणून दाऊदने त्याला धोकादायक वाटत असलेल्या सहकाऱ्यांना धडा शिकवायचे ठरवल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :crimeगुन्हेMumbaiमुंबईDawood Ibrahimदाऊद इब्राहिमInternationalआंतरराष्ट्रीयLondonलंडन