शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपीने तरुणीला इशारा केला अन‌् नागरिकांनी धू... धू...  धुतले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2020 20:38 IST

Crime News : बेंडाळे महाविद्यालयाजवळील घटना : सततच्या प्रकाराने विद्यार्थिनी त्रस्त

ठळक मुद्देभारत नानकराम रामचंदानी (रा.सिंधी कॉलनी) असे या तरुणाचे नाव असून त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली. भरदिवसा जळगाव शहरात असा प्रकार होत असल्याने आमच्या मुली सुरक्षित आहेत कशावरुन असा संतप्त सवाल या घटनेतील तरुणीच्या वडीलांनी पोलिसांकडे केला.

जळगाव : बेंडाळे महाविद्यालयाच्या परिसरात दुचाकीवर थांबलेल्या तरुणीला मद्यपी तरुणाने इशारा केला अन् त्याच्यावर क्षणातच पब्लीक मार पडला. पोलिसांनी त्याला लोकांच्या तावडीतून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात आणले. भारत नानकराम रामचंदानी (रा.सिंधी कॉलनी) असे या तरुणाचे नाव असून त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली. गुरुवारी सायंकाळी साडे चार वाजता ही घटना घडली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील १८ वर्षीय तरुणी गुरुवारी दुपारी दुचाकीने गावात आली होती. बेंडाळे महाविद्यालयाजवळ थांबली असता, तेथे समोरच भारत रामचंदानी हा दुचाकीवर थांबलेला होता. मद्याच्या नशेत तर्रर असलेल्या भारत याने तरुणीला लांबूनच इशारा केला. एक वेळा दुर्लक्ष केल्यानंतरही त्याने हा प्रकार सुरुच ठेवल्याने तरुणीने वडील व नातेवाईकांना फोन करुन तेथे असलेल्या लोकांना सांगितला. तरुणीने त्याच्या कानाखाली लगावताच त्याच्यावर पब्लीक मार पडला. त्याचवेळी निर्भया व शहर पोलीस ठाण्याचे वाहन या भागात आले. शहर पोलिसांनी त्याला जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात नेले. तेथे त्याच्याही पालकांना बोलावण्यात आले. तरुणीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.दरम्यान, बेंडाळे महाविद्यालयाच्या बाहेर टवाळखोर मुले नेहमीच थांबून विद्यार्थिनींची छेड काढत असतात, तर काही रिक्षा चालकांकडूनही असा प्रकार केला जातो. भीतीपोटी विद्यार्थीनी हा प्रकार सांगत नाहीत. काही तरुण तर तरुणींचा घरापर्यंत पाठलाग करतात तसेच शिट्या वाजवून इशारा करतात. भरदिवसा जळगाव शहरात असा प्रकार होत असल्याने आमच्या मुली सुरक्षित आहेत कशावरुन असा संतप्त सवाल या घटनेतील तरुणीच्या वडीलांनी पोलिसांकडे केला.

टॅग्स :MolestationविनयभंगJalgaonजळगावPoliceपोलिसArrestअटक