कल्याणमध्ये मद्यधुंद तरुणींनी घातला धिंगाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 03:50 IST2018-09-25T03:50:43+5:302018-09-25T03:50:56+5:30

दोन मद्यधुंद तरुणींनी एका सिगारेटविक्रेत्याला शिवीगाळ करून त्याच्या सामानाची नासधूस केल्याची घटना कल्याण रेल्वेस्थानक परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली.

 Drunken women inserted in Kalyan | कल्याणमध्ये मद्यधुंद तरुणींनी घातला धिंगाणा

कल्याणमध्ये मद्यधुंद तरुणींनी घातला धिंगाणा

कल्याण : दोन मद्यधुंद तरुणींनी एका सिगारेटविक्रेत्याला शिवीगाळ करून त्याच्या सामानाची नासधूस केल्याची घटना कल्याण रेल्वेस्थानक परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली.
डोंबिवलीमध्ये राहणारी एक तरुणी तिच्या मैत्रिणीसोबत सोमवारी पहाटेच्या सुमारास कल्याणमध्ये आली होती. दारूच्या नशेत असलेल्या या तरुणीने एका विक्रेत्याकडे सिगारेटची मागणी केली. यावेळी त्यांच्यात वाद झाला. या वादातून तरुणींनी विक्रेत्याला शिवीगाळ केली. लाथा मारून टपरी खाली पाडली. तरुणीच्या कुटुंबीयांना महात्मा फुले चौक पोलिसांनी ठाण्यात बोलावून घेतले. तरुणीला समज देऊन पोलिसांनी कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.

Web Title:  Drunken women inserted in Kalyan