मद्यधुंद पतीने बांबूच्या दंडुक्याने वार करून केला पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 06:49 PM2020-10-19T18:49:26+5:302020-10-19T18:49:38+5:30

Crime News, Buldhana आरोपीने बांबूच्या दंडुक्याने मिराचे डोके, छातीवर सतत प्रहार केले.

Drunk husband kills wife at Sonal village of Buldhana District | मद्यधुंद पतीने बांबूच्या दंडुक्याने वार करून केला पत्नीचा खून

मद्यधुंद पतीने बांबूच्या दंडुक्याने वार करून केला पत्नीचा खून

googlenewsNext

सोनाळा : संत्रा मळ्यात रखवालदारासाठी आलेल्या कुटुंबातील पत्नीचा पतीने मद्यधुंद अवस्थेत बांबूच्या दंडुक्याने सतत वार करून जागीच ठार  केल्याची घटना रविवारा रात्री उशिरा सोनाळा-टुनकी मार्गावरील पायविहिर शेतशिवारात घडली. माहिती मिळताच पोलिसांना महिलेला रूग्णालयात दाखल करत आरोपी गणेश दयाळू बिलेवीकर याला अटक केली. मृत महिलेचे नाव मिरा गणेश बिलेवीकर आहे.
धारणी तालुक्यातील डाबकी येथील बिलेवीकर पती-पत्नी सोनाळा येथील आेमप्रकाश खंडेलवाल यांच्या संत्र्यांच्या मळ्यात रखवालदारीचे काम करत होते. रविवारी सोनाळ्याचा बाजार होता. तेथून गणेशने २०० रूपयांची दारू खरेदी केली. त्या दोघांनीही दारू प्राशन केली. सायंकाळी सात वाजता जेवण आटोपले. पत्नी मिरा ही एका डोळ्याने अधू तर एका हाताने दिव्यांग होती. त्यामुळे आरोपी गणेशला पत्नीची सर्व कामे करावी लागत होती. भाकरी करण्यापासून ते भांडी धुण्यापर्यंतची कामे करणे, तसेच दिव्यांगत्वाच्या मुद्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यातच आरोपीने टणक बांबूच्या दंडुक्याने मिराचे डोके, छातीवर सतत प्रहार केले. त्यामध्ये ती जागीच ठार झाली. पुढील तपास ठाणेदार चोरे यांच्च्या मार्गदर्शनात उपनिरिक्षक प्रकाश पवार करीत आहेत.

 

Web Title: Drunk husband kills wife at Sonal village of Buldhana District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.