शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर; गृह, संरक्षण, अर्थ, परराष्ट्र, महामार्ग अन् रेल्वे मंत्रालय भाजपकडे...
2
Ajit Pawar : वर्धापन कार्यक्रमात अजितदादा शरद पवारांचे नाव घेऊन भावुक; म्हणाले, "२४ वर्ष साहेबांनी पक्षाचं...",
3
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय; ३ कोटी लोकांना होणार फायदा
4
काहीजण संपर्कात, योग्यवेळी आमच्यासोबत येतील; जयंत पाटलांचा अजित पवार गटाला सूचक इशारा
5
टीम इंडिया पाकिस्तानात जाणार? पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ICC कडे सोपवले वेळापत्रक
6
भाजपा मोठा भाऊ मान्य, पण शिंदेंना जितक्या जागा तितक्याच आम्हाला मिळाव्यात - छगन भुजबळ
7
आमचे 7 खासदार असूनही आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद का नाही? शिंदे गटाने जाहीर केली नाराजी...
8
"आमचे १०५ आमदार तरीही शिंदे मुख्यमंत्री झालेत"; श्रीरंग बारणेंच्या विधानावर भाजपा संतप्त
9
अम्पायरशी भिडणं Matthew Wade च्या अंगलट; ऑस्ट्रेलियन खेळाडूला ICC चा सज्जड दम
10
२८८ मतदारसंघात ताकदीने कामाला लागा; उद्धव ठाकरेंचे आमदार, खासदारांसह पदाधिकाऱ्यांना आदेश
11
"पक्षाचा आदेश पाळावाच लागणार"; अजितदादांसमोर सुनिल तटकरेंनी मुंडे, मुश्रीफ सगळ्यांनाच सुनावलं
12
भारत-पाक सामन्यानंतर MCA चे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन; देवेंद्र फडणवीसांशी होतं जवळचं नातं
13
... तर विधानसभेला काँग्रेसचे सगळे उमेदवार पाडणार; मनोज जरांगे का संतापले?
14
दोन वर्ष डेट केल्यानंतर बनले आयुष्याचे जोडीदार; जसप्रीत-संजनाची भारी लव्ह स्टोरी
15
या ₹3 च्या स्टॉकवर गुंतवणूकदारांच्या उड्या! LIC कडे तब्बल 97 लाख शेअर, कंपनीने घेतलाय मोठा निर्णय
16
काल शपथ अन् आता मंत्रिपद सोडण्याची इच्छा? सुरेश गोपी यांनी स्वतः केला खुलासा, म्हणाले...
17
मोठी बातमी: अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल; भाजप नवीन चेहऱ्यांना संधी देणार?
18
PM Narendra Modi : जेडीयू-टीडीपी की भाजप, कोणाला मिळणार लोकसभा अध्यक्षपद? नेमकी चर्चा कोणाची
19
Love Life: 'या' राशीची बायको मिळाली तर तुमची काळजीच मिटली म्हणून समजा!
20
IND vs PAK : "पाकिस्तानला शत्रूची गरज नाही कारण ते...", वसीम अक्रमची संतप्त प्रतिक्रिया

हजार कोटींचे ड्रग्ज गुजरातमधून जप्त, अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 7:45 AM

Drugs : गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने गुजरातमधील ड्रग्जची फॅक्टरी उद्ध्वस्त करत हजार कोटी किमतीचा ५१३ किलो एमडीचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी कंपनीचा मालक गिरिराज दीक्षित याला बेड्या ठोकल्या आहेत. 

मुंबई : ऑरगॅनिक रसायनशास्त्रातील पदवीधर आणि दोन कंपन्यांचा सीईओ राहिलेल्या एमडी तस्करीचा मास्टरमाइंड प्रेमप्रकाश सिंग (५२) याच्या चौकशीतून  एमडी तस्करीचे गुजरात कनेक्शन उघडकीस आले आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने गुजरातमधील ड्रग्जची फॅक्टरी उद्ध्वस्त करत हजार कोटी किमतीचा ५१३ किलो एमडीचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी कंपनीचा मालक गिरिराज दीक्षित याला बेड्या ठोकल्या आहेत. 

मुंबईतील शिवाजीनगर, गोवंडी येथून शमशुल्ला खान (३८) या ड्रग्ज तस्कराला २५० ग्रॅम एमडीसह ताब्यात घेत अटक केल्यानंतर अमली पदार्थविरोधी विभागाच्या वरळी कक्षाने ड्रग्ज विक्रीची ही साखळीच शोधून काढली आहे. त्यातील प्रेमप्रकाश हा वेगवेगळ्या फॅक्टऱ्यांमधून ड्रग्ज बनवून घेत असल्याची माहिती समोर आल्यावर अंबरनाथमधील फॅक्टरीचा व्यवस्थापक किरण पवार (५३) याला बेड्या ठोकल्या. त्यापाठोपाठ पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरळी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप काळे यांच्या पथकाने एमडी तस्करीचे गुजरात कनेक्शन उघडकीस आणले. अंकलेश्वर तालुक्यातील पानोली येथील दीक्षितची जीआयडीसीमधील फॅक्टरी उद्ध्वस्त केली. दीक्षित हा गेल्या १२ वर्षांपासून केमिकल फॅक्टरी चालवत आहे.

गेल्या वर्षभरापासून तोही सिंगच्या रॅकेटमध्ये सहभागी होत त्याला एमडी बनवून देत होता. गुन्हे शाखेच्या पथकाने १३ ऑगस्टला छापेमारी करत ५१३ किलो एमडी ड्रग्जसह एमडी तयार करण्याच्या प्रक्रियेतील ८१२ किलो पांढऱ्या रंगाची पावडर आणि ३९७ किलो वजनाचे तपकिरी रंगाचे खडे असा १ हजार २६ कोटींचा एमडी साठा जप्त केला आहे. 

आतापर्यंत २४०० कोटींचा माल जप्त अमली पदार्थविरोधी विभागाच्या वरळी कक्षाने या कारवाईत आतापर्यंत एकूण ७ आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याजवळून तब्बल २ हजार ४३५ कोटी रुपये किंमतीचा १ हजार २१८ किलो एमडी साठा जप्त केला आहे. तसेच अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.

टॅग्स :Drugsअमली पदार्थCrime Newsगुन्हेगारी