शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

अफगाणिस्तानमधून भारतात आलेले १ हजार कोटींचा अमली पदार्थ जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 9:17 PM

न्हावा शेवा बंदरातील कंटेनरमधून या दोन्ही तपास यंत्रणांनी 1 हजार कोटी रुपयांचे 191 हेरॉईन जप्त केले आहे.

ठळक मुद्देमूळ इराणमधील तस्करांनी पाठविलेले हे हेरॉईन अफगाणिस्तानमधून भारतात आले होते. याप्रकरणी ड्रग्स इम्पोर्टचे कागदपत्र बनविणाऱ्या दोन कस्टम हाऊसच्या एजंटला देखील अटक करण्यात आली आहे.

नवी मुंबईच्या न्हावाशेवा बंदरात महसूल गुप्तचर संचालनालय (डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स (DRI)) आणि कस्टम विभागाने संयुक्तरित्या कारवाई करून आतापर्यंतच्या सर्वात मोठा अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. न्हावा शेवा बंदरातील कंटेनरमधून या दोन्ही तपास यंत्रणांनी 1 हजार कोटी रुपयांचे 191 हेरॉईन जप्त केले आहे.मूळ इराणमधील तस्करांनी पाठविलेले हे हेरॉईन अफगाणिस्तानमधून भारतात आले होते. हे 191 किलो हेरॉईन प्लास्टिक पाईपमध्ये लपवून ठेवले होते. याप्रकरणी ड्रग्स इम्पोर्टचे कागदपत्र बनविणाऱ्या दोन कस्टम हाऊसच्या एजंटला देखील अटक करण्यात आली आहे. त्याशिवाय चार इतर इम्पोर्टर आणि फायनान्ससर्सना अटक करण्यात आली आहे.नेरूळच्या एम. बी. शिपिंग आणि लॉजिस्टिक सोलुशनचे कस्टम हाऊस एजंट मीनानाथ बोडके आणि मुंबईचे कोंडीभाऊ पांडुरंग गुंजाळ यांना आज न्यायालयात सादर करण्यात आले होते. त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. यामागे फार मोठे आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे. त्याआधी अमृतसरमध्ये जानेवारी महिन्यात पंजाब पोलिसांच्या एसटीएफने कारवाई करून 194 किलो हेरॉईन पकडले होते. आरोपी मीनानाथ बोडके यांनी सांगितले आहे की, मोहम्मद नुमान नावाच्या माणसाने दिल्लीच्या सर्विम एक्सपोर्टचे इम्पोर्टर सुरेश भाटिया यांच्यासोबत भेट घडवून आणली होती. विशेष म्हणजे सुरेश भाटिया हा यापूर्वीही ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली तुरुंगात गेलेला आहे. आता सर्वच गुप्तहेर यंत्रणा या प्रकरणी कसून तपास करीत आहेत.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

लज्जास्पद! मुलांसमोरच  'टॉपलेस' होऊन अर्धनग्न शरीरावर पेंटिंग काढून घेणं पडलं महागात, रेहाना फातिमा सरेंडर

 

६ वर्षाच्या मुलीचं अपहरण करून केले लैंगिक शोषण, ४ दिवसांनंतरही आरोपी फरार

 

दुर्दैवी अंत! लाकडाच्या ढिगाऱ्यावर कुत्रा चढल्याने दोन मुलींचा मृत्यू        

 

IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर अनिश्चिततेचे सावट, अद्याप ठोस निर्णय नाही 

टॅग्स :Drugsअमली पदार्थDirectorate of Revenue Intelligenceमहसूल गुप्तचर संचालनालयArrestअटकNavi Mumbaiनवी मुंबई