ड्रग्स बाळगल्याचे प्रकरण; बॉलीवूड अभिनेता अरमान कोहलीचा जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 19:46 IST2022-09-20T19:46:10+5:302022-09-20T19:46:23+5:30
ड्रग्स प्रकरणी दोन नायजेरियना अटक केल्यानंतर एनसीबीने कोहलीला अटक केले. मुख्य आरोपींच्या चौकशीदरम्यान कोहलीचे नाव पुढे आले.

ड्रग्स बाळगल्याचे प्रकरण; बॉलीवूड अभिनेता अरमान कोहलीचा जामीन मंजूर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोकेन बाळगल्याप्रकरणी आरोपी असलेला बॉलीवूड अभिनेता अरमान कोहली याचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने मंगळवारी मंजूर केला. तब्बल एक वषाने त्याची कारागृहातून सुटका होणार आहे.
न्या. नितीन सांब्रे यांनी अरमना कोहलीची एक लाख रुपयाच्या बंधपत्रावर त्याची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. ५० वर्षीय कोहलीची जामिनावर सुटका करताना न्यायालयाने म्हटले की, अपीलकर्त्याने पुन्हा अशाप्रकारच्या गुन्ह्यात सहभागी होऊ नये. दरम्यान, न्यायालयाने कोहलीला महिन्यातून एकदा एसीबीच्या कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश दिले.
कोहलीन जामीन अटींचे उल्लंघन केले तर एनसीबी जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात जाऊ शकते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
ड्रग्स प्रकरणी दोन नायजेरियना अटक केल्यानंतर एनसीबीने कोहलीला अटक केले. मुख्य आरोपींच्या चौकशीदरम्यान कोहलीचे नाव पुढे आले.