Drug Case: Famous Mustache Panwala arrested by NCB | Drug Case : प्रसिद्ध मुच्छड पानवालाला एनसीबीने केली अटक 

Drug Case : प्रसिद्ध मुच्छड पानवालाला एनसीबीने केली अटक 

ठळक मुद्देएक ब्रिटीश नागरिक करण सजनानीने चालवलेल्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपीने तिवारी यांच्या दुकानाचं नाव घेतल्याने एनसीबीने त्यांना समन्स पाठवून सोमवारी बोलावले होते.

ड्रग्ज तस्करी प्रकरणात एनसीबीकडून दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. आता या प्रकरणात मुंबईच्या प्रसिद्ध मुच्छड पानवालाचे देखील नाव गुंतलं असल्याचं उघड झालं आहे. NCB कडून मुच्छड पानवालाला समन्स बजावण्यात आलं होतं, त्यानुसार काल एनसीबीने चौकशी केली, नंतर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. मुच्छड पानवालाचे दुकान मुंबईतील साऊथ कॅम्प्स कॉर्नर इथं आहे. जयशंकर तिवारी यांचं हे दुकान आहे.  मुच्छड पानवालाचं नाव मुंबईमध्ये खूप प्रसिद्ध आहे.

बॉलिवूडचे अनेक दिग्गज कलाकार, अनेक बडे उद्योगपती या मुच्छड पानवालाचे ग्राहक आहेत. प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ हा सुद्धा याच पानवाल्याकडून नेहमी पान खातो. त्याचबरोबर अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक सेलिब्रिटींच्या घरी इथून पान जातं. सध्या हे दुकान उत्तर प्रदेशातील तिवारीपूरचे तिसऱ्या पिढीतील जयशंकर तिवारी चालवतात. मुच्छड पानवाला यांनी मुंबईतील नेपियन्सी रोड, मुंबई सेंटर आणि खेतवाडीमध्ये आपल्या दुकानाची शाखा सुरु केली आहे. 

प्रसिद्ध मुच्छड पानवालाला एनसीबीने बजावले समन्स, कोण आहे मुच्छड पानवाला जाणून घ्या?

एक ब्रिटीश नागरिक करण सजनानीने चालवलेल्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपीने तिवारी यांच्या दुकानाचं नाव घेतल्याने एनसीबीने त्यांना समन्स पाठवून सोमवारी बोलावले होते. करण सजनानी या ब्रिटिश नागरिक आणि अन्य दोन महिलांना अटक केली होती. अटक केलेल्या महिलांपैकी एकाची ओळख रहिला फर्निचरवाला असे आहे, जी यापूर्वी बॉलिवूड अभिनेत्रीसाठी मॅनेजर म्हणून काम करीत होती.

Web Title: Drug Case: Famous Mustache Panwala arrested by NCB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.