शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' वाहनचालकावर रेल्वे संपत्तीचे नुकसान केल्याने गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 21:02 IST

 मोठागाव येथे जीपची रेल्वे फाटकाला धडक

ठळक मुद्दे जखमी चालकावर पनवेलमध्ये उपचार केबिन, गेट यंत्रणेचे नुकसान रेल्वेगेटमन मात्र सुरक्षित

 

डोंबिवली - पश्चिमेकडील मोठागाव रेतीबंदर रोडवर मोठा गाव ठाकुर्ली येथे रेल्वे फाटकाला एका भरधाव जीपने धडक दिल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. त्या अपघातातरेल्वे फाटक तोडून रेल्वे रूळांमध्ये गेलेल्या स्कॉर्पिओला भगतकी कोठी ते पुणे या लांबपल्याच्या रेल्वेची धडक बसली. त्या धडकेने जीप नजीकच्या रेल्वे केबिनमध्ये घुसली आणि त्या चौकीचेही नुकसान झाले. या अपघातात चालक प्रदीप बांगर, उळंच वाडी, जुन्नर येथे मूळचा रहिवासी असून सध्या कार चालकाचा व्यवसायानिमित्त तो पनवेल येथे बहिणीकडे राहतो, तो अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पनवेल येथे खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. त्याच्यावर रेल्वे संपत्तीचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मोठागाव येथील फाटकाच्या पलिकडील दिशेकडून तो शहराच्या दिशेने येत असतांना हा अपघात घडला. मध्यरात्री पावणेदोन वाजता ही घटना घडली, त्यावेळी लांबपल्याची गाडी येत असल्याने फाटक बंद झाले होते. तरीही चालकाचा तोल सुटल्याने ते फाटक तोडून तो वसईकडे जाणारा पहिला रेल्वे रूळ ओलांडून पुढे गेला, त्यादरम्यान लांबपल्याची पुण्याच्या दिशेने जाणारी गाडीची धडक वाहनाला बसली आणि ते वाहन चौकीत घुसले. त्यामुळे चौकीचे नुकसान झाले आणि फाटक वर खाली करणा-या यंत्रणेचेही नुकसान झाले.सुदैवाने रेल्वे गेटमन त्या अपघातात वाचला असून त्याना कोणतीही इजा झालेली नाही. अपघातानंतर काही वेळाने डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी जात त्या चालकाला तातडीने उपाचारार्थ शास्त्रीनगर रूग्णालयात हलवले, पण तेथील वैद्यांनी त्यास सायन येथे हलवण्याचे आदेश दिले. परंतू बांगर याच्या कुटूंबियांनी मात्र त्यास खासगी इस्पितळात उपचार करण्याचा निर्णय घेतला. आणि ते त्यास घेऊन गेले. मात्र या घटनेमुले भारतीय संपत्तीचे नुकसान झाले असून रेल्वे अ‍ॅक्ट अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती तपासाधिकारी वरिष्ठ पोलिस निरिक्षक सतीश पवार यांनी दिली. त्याच्यावर उपचार झाल्यानंतर चौकशी करून पुढील कार्यवाही करणार असल्याचे पवार म्हणाले.अपघातात बांगर हा बेशुद्ध झाला होता, त्यामुळे अपघात कसा घडला याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही. पण प्राथमिक माहितीनूसार तो एखाद्या कॉलसेंटरमध्ये कार चालक असून भाडे मिळाल्याने तो या ठिकाणी आला होता. तेथून परत जात असतांना त्याचा हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Accidentअपघातrailwayरेल्वेPoliceपोलिस