शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये डीआरआयची कारवाई, ३५ लाखांचे अमली पदार्थ जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 23:47 IST

या प्रकरणी अमली पदार्थ कायद्यांतर्गत (एनडीपीएस) गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात आली.   

ठळक मुद्देआरोपी रोहन गवांसला अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी १३ मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.आरोपीने स्वतःच्या कारमध्ये एका छुप्या कप्प्यात अमली पदार्थ लपवला होता.

मुंबई- महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) मुंबई विभागाने ३६ वर्षाच्या रोहन गवांसला अटक केली आहे. या तरुणाकडून ३५ लाख रुपयांचे ३२० ग्रॅम मेथामॅफेटॅमिन हा अमली पदार्थ जप्त केला. मेथामॅफेटॅमिन या अमली पदार्थावर देशात बंदी आहे. याआधी २०१५ मध्ये रोहनला मेफेड्रोन या अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी अटक झाली होती.

आरोपीने स्वतःच्या कारमध्ये एका छुप्या कप्प्यात अमली पदार्थ लपवला होता. अचूक माहितीआधारे डीआरआयने वॉरंट बजावून आरोपीला त्याची कार दाखवण्यास सांगितले. सोसायटीतील सदस्यांच्या उपस्थितीत कारची सखोल तपासणी केल्यावर अमली पदार्थांचा साठा मिळाला. या प्रकरणी अमली पदार्थ कायद्यांतर्गत (एनडीपीएस) गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात आली.   भारतात मेथामॅफेटॅमिन हे 'स्पीड' आणि 'आईस' या दोन नावांनी उच्चभ्रूंच्या पार्ट्यांमध्ये विकले जाते. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच देशात मेथामॅफेटॅमिन जप्त झाले आहे. या प्रकरणात अटक झालेल्या रोहन गवांस याची सखोल चौकशी सुरू आहे. रोहन अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या लोकांपैकी एक आहे. त्याच्या चौकशीतून तस्करांच्या जाळ्याविषयी आणखी माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आरोपी रोहन गवांसला अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी १३ मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Coronavirus : मौलाना साद यांची चौकशी करणारे पोलिसच कोरोनाच्या विळख्यात, चार जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

 

देवेंद्र फडणवीस यांच्यावर विकृत पोस्ट टाकणाऱ्यांवर कारवाई करा, भाजपाचे पोलीस आयुक्तांना साकडे

टॅग्स :Directorate of Revenue Intelligenceमहसूल गुप्तचर संचालनालयArrestअटकDrugsअमली पदार्थ