विदेशात उच्चशिक्षणाचे स्वप्न भंगले; सात लाखांना ऑनलाइन गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 08:48 PM2021-01-12T20:48:32+5:302021-01-12T20:50:37+5:30

संशयित सायबर गुन्हेगाराने कुठलेही प्रमाणपत्र सोनवणे यांना दिले नाही. त्यानंतर आपली गुन्हेगाराकडून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सोनवणे यांनी तात्काळ सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली.

The dream of higher education abroad was shattered; Seven million online gangsters | विदेशात उच्चशिक्षणाचे स्वप्न भंगले; सात लाखांना ऑनलाइन गंडा

विदेशात उच्चशिक्षणाचे स्वप्न भंगले; सात लाखांना ऑनलाइन गंडा

Next
ठळक मुद्देप्रमाणपत्राचे आमिष ६ हजार ८३८ रुपये ऑनलाइन बँकिंग प्रणालीद्वारे पाठविले

नाशिक : जर्मनीमध्ये उच्चशिक्षण घेण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या एका युवकाला संशयित सायबर गुन्हेगाराने तब्बल ७ लाख ६ हजार ८३८ रुपयांना ऑनलाइन गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी युवकाच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, राजेंद्र गोविंद सोनवणे (रा. मराठानगर, जेल रोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना २१ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२० या कालावधीत दोन वेगवेगळ्या क्रमांकांवरून फोन आले व जर्मनीत जाऊन उच्चशिक्षण घेण्यासाठी आवश्यक असलेले ह्यआयईएलटीएसह्ण परीक्षेचे प्रमाणपत्र व इतर आवश्यक ती कागदपत्रे मिळवून देण्याचे आश्वासन समोरच्या भामट्याने दिले. त्यासाठी त्याने पैशांची मागणी केली. प्रमाणपत्र थेट मिळत असल्याच्या आमिषाला बळी पडत सोनवणे यांनी त्या अनोळखी व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहार करत सुमारे ७ लाख ६ हजार ८३८ रुपये ऑनलाइन बँकिंग प्रणालीद्वारे पाठविले. यानंतर संशयित सायबर गुन्हेगाराने कुठलेही प्रमाणपत्र सोनवणे यांना दिले नाही. त्यानंतर आपली गुन्हेगाराकडून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सोनवणे यांनी तात्काळ सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. दरम्यान, सोनवणे यास ज्या दोन कमांकांवरून फोन आले ते उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथील असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून तंत्रविश्लेषण शाखेच्या माध्यमातून केला जात आहे.

Web Title: The dream of higher education abroad was shattered; Seven million online gangsters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.