शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?
2
Video: शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास वसई किल्ल्यावर रोखले; परप्रांतीय सुरक्षा रक्षकाचा प्रताप
3
'आम्ही आमची धोरणं ठरवू; अमेरिकेवर अवलंबून राहण्याची गरज नाही', नेतन्याहूंची स्पष्टोक्ती
4
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
5
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
6
फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का, जाणून घ्या नवीन दर...
7
Kagiso Rabada Record : रबाडाचा बॅटिंगमध्ये मोठा धमाका! पाकिस्तान विरुद्ध ११९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला
8
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
9
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
10
भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले
11
षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; ५०० रूपयांत दहशतवादी मसूद अजहरची बहीण चालवतेय कोर्स
12
फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
13
तब्बल ५५०० किलो सोन्यातून उजळले भगवान बुद्ध; एका चुकीने उलगडलं कित्येक दशक दडलेले 'रहस्य'?
14
"अक्षय कुमार सध्या डिप्रेशनमध्ये आहे, कारण..."; 'हेरा फेरी'चे दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा मोठा खुलासा
15
शौक बड़ी चीज है! दृष्टी गमावताच डोळ्यात बसवला २ कॅरेटचा हिरा, रंगली तुफान चर्चा
16
‘निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी आमदारांना निधीच्या रूपात वाटली जातेय खैरात’, काँग्रेसचा आरोप
17
मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये होणार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
18
हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव
19
काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?
20
दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."

Dr. Sheetal Amte Suicide: डॉ. शीतल आमटेंनी केले होते गंभीर आरोप; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

By पूनम अपराज | Updated: November 30, 2020 15:06 IST

Dr. Sheetal Amte Suicide: आमटे कुटुंबीयानी निवेदन जारी करून शीतल आमटे याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सांगितले होते.त्याचप्रमाणे शीतल यांनी केलेल्या आरोपींबाबत असहमती दाखवली होती. 

ठळक मुद्दे गेल्या अनेक दशकापासून आनंदवनशी जोडलेल्या राज्यातील अनेक कलावतांनी आमटे कुटुंबियांशी चर्चा करून कौटुंबिक कलह संपावेत यासाठी प्रयन सुरू केले होते.आमटे कुटुंबातील वादामुळे मुलाचा कारभार काढून मुलीला सोपविल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. 

चंद्रपुर - महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि  डॉ. बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे करजगी यांनी विषारी इंजेक्शन घेऊन  आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. अलीकडेच समितीमधील पदाधिकारी आणि आमटे कुटुंबातील सदस्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यावर आमटे कुटुंबीयानी निवेदन जारी करून शीतल आमटे यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सांगितले होते. त्याचप्रमाणे शीतल यांनी केलेल्या आरोपांबाबत असहमती दाखवली होती. दरम्यान, चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. आनंदवनमधील वाद आणि तक्रारी या गंभीर स्वरूपाच्या असून त्यात सरकारने हस्तक्षेप करण्याची वेळ व्यवस्थापनाने येऊ देऊ नये. आमटे कुटुबीयांनी स्वतः पुढाकार घेऊन या वादावर लवकरात लवकर तोडगा काढावा, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. केवळ राज्यच नाही तर देश-परदेशातून अनेकांनी आमटे कुटुंबातील हे वाद मिटविण्यासाठी पुढाकार घेतला होता. गेल्या अनेक दशकापासून आनंदवनशी जोडलेल्या राज्यातील अनेक कलावतांनी आमटे कुटुंबियांशी चर्चा करून कौटुंबिक कलह संपावेत यासाठी प्रयन सुरू केले होते.

Dr Sheetal Amte Sucide News : धक्कादायक! आनंदवन येथे डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

ज्येष्ठ समाजसेवकबाबा आमटे आणि साधना आमटे यांनी १९४९ मध्ये या आनंदवनाची स्थापना केली. त्यामुळे संपूर्ण समाज नाकारत असलेल्या कुष्ठरोग्यांना याठिकाणी आश्रय मिळाला. बाबांनी त्यांची सेवा केली. त्यांना जगण्याची नवी प्रेरणा दिली. मात्र कुष्ठरोग्यांवर उपचार करणारे केंद किंवा रुग्णालय होऊ नये याकडेही बाबंनी लक्ष दिले होते. त्यातूनच त्यांनी कुष्ठरोग्यांच्या श्रमातून औद्योगिक वसाहत उभी केली. त्याचबरोबर साधना आमटे यांनी देखील कष्ट करून दोघांच्या मेहनतीने आनंदवन उभे राहिले. समाजाने नाकारलेल्या कुष्ठरोग्यांना स्वयंपूर्ण करून जगायला त्यांनी शिकविले. बाबा आणि साधना आमटे यांच्या निधनानंतर आनंदवनची सूत्रे त्यांचे सुपुत्र विकास आमटे यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यांनी काही काळ कारभार साभाळल्यानंतर त्यांचा मुलगा कौस्तुभ यांची महारोगी सेवा समितीवर नियुक्ती करण्यात आली. मात्र, मूलगी शीतल आमटे करजगी यांना समितीवर स्थान दिले गेले. आमटे कुटुंबातील वादामुळे मुलाचा कारभार काढून मुलीला सोपविल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. 

 

टॅग्स :Suicideआत्महत्याbaba amteबाबा आमटेsocial workerसमाजसेवकdoctorडॉक्टरDr Sheetal Amteडॉ शीतल आमटे