शहरं
Join us  
Trending Stories
1
शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?
2
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
3
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
4
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...
5
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
6
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
7
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
8
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
9
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
10
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
11
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
12
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
13
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
14
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
15
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
16
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
17
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
18
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
19
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
20
May Born Astro: मे महिन्यात जन्मलेले लोक म्हणजे चेहऱ्याने लोभस, डोक्याने तापट आणि लहरी स्वभावाचे मिश्रण!

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : आरोपी विक्रम भावेचा जामीन पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 3:53 PM

 पुढील सुनावणी ३० जानेवारीला ठेवण्यात आली आहे. 

ठळक मुद्देविक्रम भावे यांच्यावर डॉ. दाभोळकर हत्या प्रकरणात रेकी केल्याचा आरोप असून पुढील सुनावणी ३० जानेवारीला ठेवण्यात आली आहे.  दाभोलकर हत्याप्रकरणी पुरावे नष्ट करणे, आरोपींना मार्गदर्शन करण्याचे आरोप आहेत तर विक्रम भावेवर आरोपींना दाभोलकरांची ओळख करुन देणे, प्रत्यक्ष घटनास्थळाची रेकी करणे हे आरोप ठेवण्यात आले आहेत.

मुंबई - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डाॅ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित आरोपी विक्रम भावेचा जामीन अर्ज पुणेसत्र न्यायालयाने फेटाळला. विक्रम भावे यांच्यावर डॉ. दाभोळकर हत्या प्रकरणात रेकी केल्याचा आरोप असून पुढील सुनावणी ३० जानेवारीला ठेवण्यात आली आहे. गेल्यावेळी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात संशयित आरोेपी म्हणून अटक करण्यात आलेले विक्रम भावे यांचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला होता. बचाव पक्षाच्या वकिलांनी विक्रम भावेचा जामीन अर्ज मंजूर करण्यात यावी अशी मागणी जिल्हा सत्र न्यायालयाकडे केली होती. डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी विक्रम भावे आणि वकील संजीव पुनाळेकर या दोघांना २६ मे रोजी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली होती. विक्रम भावेवर आरोपींना दाभोलकरांची ओळख करुन देणे, प्रत्यक्ष घटनास्थळाची रेकी करणे हे आरोप ठेवण्यात आले आहेत.

संजीव पुनाळेकर यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्यावर दाभोलकर हत्याप्रकरणी पुरावे नष्ट करणे, आरोपींना मार्गदर्शन करण्याचे आरोप आहेत तर विक्रम भावेवर आरोपींना दाभोलकरांची ओळख करुन देणे, प्रत्यक्ष घटनास्थळाची रेकी करणे हे आरोप ठेवण्यात आले आहेत. विक्रम भावे गडकरी रंगायतन स्फोटातील आरोपी आहे. तत्पूर्वी दाभोळकर यांच्याबाबत सर्व माहिती भावे याने रेकी करून त्यांना दिली. न्यायालयात दोन्ही पक्षाचा  युक्तिवाद झाल्यानंतर न्याायालयाने संशयित आरोपी विक्रम भावे याचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता.

टॅग्स :Narendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरPuneपुणेSessions Courtसत्र न्यायालयMurderखून