शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श घालून दिलेल्या पोलीस अधिकाऱ्याला लाच घेताना एसीबीने केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 22:08 IST

Bribe Case : मेडिकल दुकानदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) याबाबत तक्रार केली. पोलीस निरीक्षक अमन आपल्याकडे लाच मागत असून आपला काहीही दोष नसताना आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असल्याचं त्याने तक्रारीत सांगितलं.

जयपूर - हुंडा न घेता लग्न केल्याने  काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेलापोलीस निरीक्षकास लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. राजस्थानमधील जयपूरमध्ये नार्कोटिक्स विभागात पोलीस निरीक्षक म्हणून काम करणाऱ्या अमन नावाच्या अधिकाऱ्याला लाच घेताना अटक करण्यात आली. एका मेडिकल दुकानदाराकडे त्यांनी पाच लाखांच्या लाचेची मागणी केली होती. एनडीपीएस कायद्यानुसार कारवाई न करण्याच्या बदल्यात ही रक्कम द्यावी, अशी मागणी या लाचखोर पोलिसाने दुकानदाराकडे केली होती. त्यानंतर २ लाखांवर मांडवली झाली होती आणि ही लाच स्विकारण्याचा एक दिवसही ठरला होता.

मेडिकल दुकानदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) याबाबत तक्रार केली. पोलीस निरीक्षक अमन आपल्याकडे लाच मागत असून आपला काहीही दोष नसताना आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असल्याचं त्याने तक्रारीत सांगितलं. त्यावर लाचलुचपत विभागाने सापळा रचून पोलीस निरीक्षकास बेड्या ठोकल्या. 

दोन वर्षांपूर्वी लग्नात हुंडा नाकारून याच पोलीस अधिकाऱ्याने आदर्श घालून दिला होता. मात्र आता लाच घेताना रंगेहाथ पकडलं गेल्यामुळं त्याने कमावलेली इज्जत गमावली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPoliceपोलिसRajasthanराजस्थानdowryहुंडा