शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

नागपुरात घरगुती वादात दुहेरी हत्याकांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2020 11:16 PM

सक्करदरा येथील दत्तात्रयनगरात घरगुती वादातून एका व्यक्तीने पत्नी व तिच्या मामाची हत्या केली. दोन दिवसांनंतर हे हत्याकांड उघडकीस आले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देदत्तात्रयनगर येथील घटना : पत्नी व मामेसासऱ्याचा खूनआरोपी पतीला अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सक्करदरा येथील दत्तात्रयनगरात घरगुती वादातून एका व्यक्तीने पत्नी व तिच्या मामाची हत्या केली. दोन दिवसांनंतर हे हत्याकांड उघडकीस आले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. हत्येनंतर फरार पतीला पोलिसांनी चार तासातच अटक केली. मंजूषा जयंत नाटेकर (५५) आणि अशोक रामकृष्ण काटे (७५) अशी मृतांची नावे आहे. जयंत नाटेकर (६०) असे आरोपीचे नाव आहे.

नाटेकर दाम्पत्य दत्तात्रयनगरातील देशमुख अपार्टमेंटमध्ये राहत होते. अशोक वोल्टास कंपनीत वाहनचालक होते. त्यांनी व्हीआरएस घेतला होता. मंजूषा या गजानन हायस्कूलमध्ये मुख्याध्यापिका होत्या. त्यांचा मुलगा सुजय चंद्रपुरात काम करतो. मंजूषाचे भाऊ संजय खणगणे आणि राजेश खणगणे जवाहरनगरात राहतात. अशोक काटे हे मंजूषाचे मामा होते. ते अविवाहित असल्याने त्यांची बहीण (मंजूषाची आई) सोबत राहत होते. दीड वर्षापूर्वी मंजूषाच्या आईचा मृत्यू झाला. तेव्हापासून अशोक काटे मंजूषाकडे राहायला आले. मंजूषाचे भाऊसुद्धा अधूनमधून येत जात होते. असे सांगितले जाते की, जयंत नाटेकर यांचा घरगुती कारणावरून पत्नी मंजूषासोबत वाद व्हायचा. सोमवारी सकाळी ११ वाजता त्याने पत्नी व तिच्या मामाशी वाद घातला. तो दोघांना मारहाण करू लागला. मामा अशोकने आरडाओरड करून शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावले. अपार्टमेंटमधील लोक मंजूषाच्या फ्लॅटमध्ये आले. शेजाऱ्यांना पाहून जयंतला आणखी राग आला. त्याने शेजाऱ्यांना ‘हा माझ्या घरचा प्रश्न’ असल्याचे सांगत जायला सांगितले. त्याचे बोलणे ऐकून शेजारी परत गेले. शेजारी परत गेल्यानंतर जयंतने दोघांची हत्या केल्याचा संशय आहे. गळा आवळल्यानंतर त्याने चाकूने वार करून मंजूषा आणि तिच्या मामाचा जीव घेतला. दोघांची हत्या केल्यानंतर फ्लॅटच्या दरवाजाला कुलूप लावून तो दुचाकीने निघून गेला. मंजूषा नियमित शाळेला जायच्या. त्या शाळेत न आल्याने मुख्याध्यापकांना संशय आला. त्यांनी मंजूषाशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने भाऊ राजेश खणगणे यांच्याशी संपर्क साधला. राजेशनेसुद्धा मंजूषाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचाही संपर्क न झाल्याने ते फ्लॅटवर पोहोचले. त्यांच्याजवळ फ्लॅटची डुप्लीकेट चावी होती. दरवाजा उघडताच दुर्गंध पसरला.राजेशला हॉलमध्ये मामा आणि बेडरूममध्ये बहिणीचे मृतदेह आढळून आले. त्यांनी पोलिसांना सूचना दिली. घटनेची माहिती होताच पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, अपर पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, उपायुक्त चिन्मय पंडित घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह मेडिकलला रवाना करीत जयंतचा शोध सुरू केला. चार तासांच्या आत तो पोलिसांच्या हाती लागला. मंजूषाने आपल्याला मारहाण केल्यामुळे आपण दोघांची हत्या केली असे त्याचे म्हणणे आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.धोका ओळखू शकले नाहीत शेजारीजर शेजाऱ्यांनी सतर्कता दाखवली असती तर या घटनेची वेळीच माहिती मिळाली असती. मिळालेल्या माहितीनुसार जयंतने हल्ला केला तेव्हा मंजूषा वाचवण्यासाठी आरडाओरड करीत होती. परंतु जयंतने आधीच फटकारल्यामुळे शेजाऱ्यांनी पुन्हा जाणे योग्य समजले नाही. त्याचप्रमाणे शेजाऱ्यांनी जयंतला फ्लॅटला कुलूप लावून जातानाही पाहिले. त्यानंतरही पत्नी आणि तिचा मामा कुठे आहे, हा विचार त्यांच्या मनात आला नाही. जयंत गेल्यावर शेजारी निश्चिंत झाले. दोन दिवस मृतदेह फ्लॅटमध्ये पडून होते. परंतु कुणालाही दुर्गंधी आली नाही.मंजूषा करायची मारहाणआरोपी जयंतच्या म्हणण्यानुसार तो गेल्या १० वर्षांपासून बेरोजगार आहे. मंजूषाच्या पगारातूनच घर चालत होते. मंजूषा त्याच्याशी योग्य व्यवहार करीत नव्हती. मंजूषाने अनेकदा त्याला थापड मारली. त्यामुळे त्याला अपमान झाल्यासारखे वाटायचे. घटनेच्या दिवशीही त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे दुखावल्याने त्याने खून केला. मंजूषाच्या कुटुंबीयांनी मात्र जयंतचे म्हणणे नाकारले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, क्षुल्लक कारणांवरून वाद होत होते. यापूर्वी जयंतने कधीच मारहाण केली नव्हती. शेजाऱ्यांचेही तेच म्हणणे आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून