शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

'मला घरी पाठवू नका'; बाप आणि भावाकडूनच अल्पवयीन मुलीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 19:45 IST

सातवीमध्ये शिकणाऱ्या पीडित मुलीस सख्खा बाप व भाऊ तिचा विनयभंग होईल, अशी वागणूक देत होते.

ठळक मुद्देबाप आणि भाऊ बळजबरीने मोबाईलवर दाखवत होते अश्लील व्हिडिओपीडितेची सावत्र आई व भाऊ या दोघांना विरोध करण्याऐवजी त्यांचे समर्थन करीत

पैठण : अल्पवयीन मुलीस विवस्त्र करून बळजबरीने मोबाईलवर तिला अश्लील व्हिडिओ दाखवून विनयभंग करणाऱ्या बाप, भाऊ व सावत्र आईविरोधात पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. 

सातवीमध्ये शिकणाऱ्या पीडित मुलीस सख्खा बाप व भाऊ तिचा विनयभंग होईल, अशी वागणूक देत होते. पीडितेची सावत्र आई व भाऊ या दोघांना विरोध करण्याऐवजी त्यांचे समर्थन करीत  होते. घरातील खोलीत तिचे कपडे काढून तिचा विनयभंग करण्याचा प्रकार वाढला होता. पीडितेने विरोध केल्यास तिला मारहाण करण्यात येत होती. घरच्या लोकांची नजर चुकवून शुक्रवारी (दि.१२) सायंकाळी ७ वाजेदरम्यान पीडित मुलगी घरातून पैठण बसस्थानकावर जाऊन बसली. रात्री ९ वाजेनंतर बसस्थानकावरील गर्दी कमी झाल्याने भेदरलेल्या चिमुकलीस रडू कोसळले. ती रडत असल्याचे पाहून काही जण तेथे जमा झाले. रडत रडतच तिने मला घरचे लोक मारून टाकतील. मला पोलीस ठाण्यात घेऊन चला, अशी विनंती केली. तेथील एका जणाने तिला पोलीस ठाण्यापर्यंत नेऊन सोडले. पोलिसांनी आरोपींना अटक करून  न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी कारागृहात केलीे.  उपनिरीक्षक सचिन सानप तपास करीत आहेत. 

हरवल्याची तक्रार देण्यासाठी बाप आणि भाऊ ठाण्यात पीडित मुलगी पोलीस ठाण्यात आली तेव्हा घरातून मुलगी हरवली आहे, अशी तक्रार घेऊन पीडितेचा भाऊ व बाप ठाण्यात हजर झाले होते. पीडित मुलीने त्यांना पाहताच पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या कक्षात धाव घेतली. पीडितेची भेदरलेली अवस्था लक्षात घेता पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी तिला विश्वास देत विचारपूस केली. मात्र, ती फक्त रडत होती. बाहेर उभे असलेल्या बाप व भावाच्या भीतीने तिची काही सांगण्याची हिंमतच होत नव्हती. शेवटी पोनि. देशमुख यांनी तिला सुरक्षेची पूर्ण हमी दिल्यानंतर ती बोलती झाली आणि ऐकणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे मन सुन्न झाले.

मला घरी पाठवू नका सदर मुलीने मला घरी पाठवू नका, अशी विनंती पोलीस निरीक्षक देशमुख यांच्याकडे केली. दरम्यान, पीडित मुलीच्या मेव्हण्यास पोलिसांनी फोन करून पोलीस ठाण्यात येण्याची विनंती केली. थोड्या वेळाने पोलिसांनी मेव्हण्यास फोन केला असता तो स्विच आॅफ दाखवत होता. पीडित मुलीस शासकीय महिला व बालविकासगृहात पाठविण्यात आले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादsexual harassmentलैंगिक छळFamilyपरिवार