शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती भांडणातून​​​​​​​ सूनेनेच केला सासूचा धारदार विळ्याने खून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 21:43 IST

Murder Case : नगरसेवकाने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यानंतर काही क्षणातच पोलीस पथक घटनास्थळी पोहचले.

ठळक मुद्देया प्रकरणी सून उज्ज्वला सोनवणे (३८)हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

भुसावळ जि. जळगाव : घरगुती भांडणातून सूनेनेच सासूच्या डोक्यात व पाठीवर विळयाने वार करुन तिचा खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी सायंकाळी ६.४० वाजेच्या सुमारास प.क.कोटेचा विद्यालयाच्या आवारात घडली. या प्रकरणी सून उज्ज्वला सोनवणे (३८)हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

द्वारकाबाई पंढरीनाथ सोनवणे (७५) असे खून झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, रवीद्र सोनवणे हे कोटेचा विद्यालयात सुरक्षा रक्षक आहेत.  शाळेच्या परिसरातच ते आई, पत्नी उज्ज्वला  हिच्यासह वास्तव्यास आहेत.    सायंकाळच्या सुमारास रवींद्र हा काही साहित्य घेण्यासाठी गावात गेला होता.  त्याचवेळी द्वारकाबाई व सून उज्ज्वला यांच्यात भांडण झाले. हे भांडण एवढ्या  विकोपाला गेले की सूनेने धारदार विळ्याने सासूची मान, डोके व पाठीवर जोरदार वार  केले. अचानक झालेल्या या हल्ल्यात द्वारकाबाई जागीच ठार झाल्या.  काही वेळाने रवींद्र हा घरी परतला. त्यावेळी आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली.  यानंतर रवींद्र हा ओळखीच्या नगरसेवकाकडे गेला.   नगरसेवकाने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यानंतर काही क्षणातच पोलीस पथक घटनास्थळी पोहचले.

टॅग्स :Deathमृत्यूDomestic Violenceघरगुती हिंसाPoliceपोलिसBhusawalभुसावळJalgaonजळगावArrestअटक