शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

डोंबिवली पुन्हा हादरली! रेल्वे रुळावर छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 19:18 IST

Crime News : लुटमारीच्या उद्देशाने दोघांवर प्राणघातक हल्ला?; एकाचा मृत्यू तर एकजण जखमी

ठळक मुद्देप्रथमदर्शनी समोर आले असलेतरी बेचनप्रसादचा मृतदेह रेल्वे रूळावर आढळल्याने ही हत्या की अपघाती मृत्यू याबाबत संशय निर्माण झाला आहे.

डोंबिवली - रिक्षा थांबवून त्यातील दोघा प्रवाशांवर लुटण्याच्या उद्देशाने चाकूने वार करून चोरटयांनी पलायन केल्याची धककादायक घटना ठाकुर्ली परिसरातील रेल्वे समांतर रोडवर घडली आहे. यातील बेचनप्रसाद चौहान या प्रवाशाचा लगतच्या रेल्वे रूळावर छिन्नविच्छीन्न अवस्थेत मृतदेह आढळुन आला असून दुसरा प्रवासी बबलु चौहान हा जखमी अवस्थेत आहे. बबलुच्या सांगण्यावरून चोरीच्या उद्देशाने त्यांच्यावर हल्ला झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले असलेतरी बेचनप्रसादचा मृतदेह रेल्वे रूळावर आढळल्याने ही हत्या की अपघाती मृत्यू याबाबत संशय निर्माण झाला आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलीस व लोहमार्ग पोलीसानी तपास सुरू केला आहे.

बेचन आणि बबलु हे दोघेही डोंबिवली पुर्वेतील शेलारनाका परिसरात भाडयाने रहात होते.  फर्निचरच्या दुकानात काम करणारे दोघेजण सोमवारी रात्री दिडच्या गाडीने उत्तरप्रदेशला जाणार होते. त्यासाठी त्यांनी शेलारनाका येथून रिक्षा पकडली. दरम्यान त रेल्वे समांतर रस्त्यावरून जात असताना काही व्यक्तींनी त्यांची रिक्षा अडवली आणि दोघांना रिक्षाबाहेर काढत रिक्षाचालकाला पळवून लावले. बेचन आणि बबलू यांना चाकूच्या धाकाने रस्त्याच्या बाजुला असलेल्या ठाकुर्ली-कल्याण दरम्यानच्या रेल्वे रूळाच्या ठिकाणी नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर चाकूने वार केले यावेळी झालेल्या हल्ल्यात बबलूने आपली कशीबशी सुटका करून घेत तेथून पलायन केले. बेचन मात्र त्यांच्या तावडीत सापडला. जखमी अवस्थेतील बबलूने ही माहिती पहाटेच्या सुमारास शेलार नाका गाठत भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांना सांगितली. प्रकरणाचे गांभिर्य कळल्यावर कांबळे यांनी बबलूला घेऊन  टिळकनगर पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी बबलूने दिलेल्या माहीतीनुसार घटनास्थळी धाव घेतली असता त्याठिकाणी बेचनचा मृतदेह छिन्नविच्छीन्न अवस्थेत आढळून आला. दरम्यान लूटमारीच्या उद्देशाने ही घटना घडल्याचा  प्राथमिक अंदाज बबलूने दिलेल्या माहीतीमधून मांडला जात असलातरी बेचनची हत्या की अपघाती मृत्यू? याचा शोध पोलिस घेत आहेत. रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजची या गुन्हयाचा छडा लागण्यात मदत होते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

टॅग्स :Deathमृत्यूdombivaliडोंबिवलीPoliceपोलिसRobberyचोरीauto rickshawऑटो रिक्षा