शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण; नऊ आरोपींच्या पोलीस कोठडीतही झाली वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 06:40 IST

या गुन्ह्यातील दोन आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

ठळक मुद्देया गुन्ह्यातील दोन आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

डोंबिवली : १५ वर्षीय पीडित मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणातील ३३ आरोपींपैकी २२ जणांच्या कोठडीत बुधवारी पाच दिवसांची वाढ झाल्यानंतर उर्वरित नऊ आरोपींनाच्या पोलीस कोठडीतही गुरुवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने पाच दिवसांची, म्हणजेच ५ ऑक्टोबरर्यंत वाढ केली आहे. 

या गुन्ह्यातील दोन आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश एस. आर. पहाडे यांच्या पोक्सो विशेष न्यायालयात गुरुवारी ९ आरोपींना हजर केले गेले. यावेळी सर्वांच्या पोलीस कोठडीत पाच दिवसांची वाढ करण्यात आली. आता २२ आरोपींना सोमवारी, तर ९ आरोपींना मंगळवारी पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल. दुपारी सव्वाचार वाजता आरोपींना न्यायालयात आणले. १५ मिनिटे सरकारी आणि बचावपक्षाचे म्हणणे ऐकल्यावर न्यायालयाने आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ केली.

न्यायालयातील सुनावणीची माहिती देण्यास सरकारी वकील आणि तपास अधिकारी यांनी नकार दिला. या गुन्ह्यात आणखी एका आरोपीच्या सहभागाचा संशय असून त्याचा शोध तसेच गुन्ह्यात वापरलेल्या वाहनाच्या तपासाकरिता  कोठडी वाढवण्याची मागणी केली होती.

मुलीचे समुपदेशनपीडित मुलीचे समुपदेशन आणि संरक्षणाच्या दृष्टिकोनातून उल्हासनगर येथील चाइल्ड ॲण्ड वूमन वेल्फेअर कमिटीच्या आदेशानुसार तिला बालगृहात ठेवण्यात आल्याची माहिती आहे; परंतु याबाबतही यंत्रणेकडून मौन बाळगण्यात आले आहे. 

लॉजबाबत काय तपास? मुरबाड येथील लॉजमध्ये पीडित मुलीवर बलात्कार झाला होता. गुरुवारच्या सुनावणीदरम्यान बचाव पक्षाच्या वतीने त्या लॉजबाबत काय तपास केला, असा सवाल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालय