शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
2
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
3
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
4
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
5
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
7
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
8
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
9
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
10
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
11
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
12
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
13
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
14
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
15
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
16
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
17
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
18
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
19
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
20
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण : सर्व आरोपी गजाआड;  आणखीन दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 20:24 IST

Dombivli gang-rape case : उदया न्यायालयात हजर करणार

ठळक मुद्देया दोन्ही आरोपींना अटक करण्यात आल्याने या गुन्हयातील सर्व आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.तब्बल 33 नराधमांनी आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याची धककादायक घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली.

डोंबिवली - 15 वर्षीय पिडीत मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात 33 जणांवर गुन्हे दाखल आहेत. रविवार्पयत 31 नराधमांना अटक केली होती. यातील दोन आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी भिवंडी बाल सुधारगृहात करण्यात आली तर अजून दोन फरार आरोपींचा शोध सुरू होता. दरम्यान या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आल्याने या गुन्हयातील सर्व आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.

तब्बल 33 नराधमांनी आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याची धककादायक घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली. तक्रार दाखल होताच तत्काळ 23 आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. यातील दोघे अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली तर उर्वरीत 12 आरोपींचा शोध सुरू होता. शुक्रवार्पयत सहा जणांना जेरबंद करण्यात आले. तर चार आरोपी फरार होते. चौघांनी मोबाईल स्विच ऑफ ठेवल्याने त्यांचा ठावठिकाणा शोधणो पोलिसांपुढे आव्हान उभे ठाकले होते. त्यामुळे आरोपींच्या नातेवाईक आणि मित्रंवर पोलिसांनी वॉच ठेवला होता. त्यांच्या माध्यमातून या चारही आरोपींना अटक करण्यात आल्याची सुत्रंची माहीती आहे. संबंधित आरोपींना कोळेगाव आणि देसलेपाडा येथून अटक करण्यात आली आहे.  दरम्यान यात आणखीन काही जणांचा सहभाग असल्याची माहीती मिळत असून त्यांचाही शोध सुरू असल्याचे सुत्रंनी सांगितले. परंतू पोलिसांनी सर्व आरोपी अटक केल्याचे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला आहे.   

न्यायालयातील सुनावणीकडे लागले लक्षनराधमांनी तिला तिच्यावर करण्यात आलेल्या बलात्काराचा व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार बलात्कार केला आहे. दरम्यान यातील काही व्हीडीओ क्लिप पोलिसांच्या हाती लागल्याची सूत्रंची माहीती असताना काही आरोपींकडून ते मोबाईलमधून डिलीट करण्यात आल्याचीही माहीती मिळत आहे. त्यामुळे आरोपींचे मोबाईल डिलीट केलेला परत मिळविण्यासाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आले आहेत. आरोपींना बुधवार्पयत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयात आरोपींना हजर केल्यावर सरकारी वकीलांकडून पोलिस कोठडी वाढवून दिली जावी अशी मागणी केली जाण्याची शक्यता आहे. तर यातील 19 आरोपींचे वकीलपत्र महिला वकील तृप्ती पाटील यांनी घेतले आहे. ते आरोपींच्या बाजूने काय युक्तीवाद करतात हे देखील पाहणो महत्वाचे ठरणार आहे.

पिडीतेला नेले होते घटनास्थळीव्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देत प्रियकरासह, मित्रंनी डोंबिवलीसह बदलापुर, रबाळे, मुरबाड या परिसरात पिडीतेवर सामुहीक बलात्कार केला आहे. दरम्यान पोलिसांकडून पिडीतेला ज्या ठिकाणी बलात्काराचा प्रकार घडला त्याठिकाणी नेण्यात आल्याची माहीतीही सुत्रंनी दिली.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळdombivaliडोंबिवलीPoliceपोलिसArrestअटकCourtन्यायालय