महिलेवर तो चाकूने वार करत राहिला, तिला वाचवण्यासाठी पाळीव कुत्र्याने केला त्याच्यावर हल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 10:36 AM2021-04-02T10:36:24+5:302021-04-02T10:38:36+5:30

ही घटना गोमतीनगर परिसरातील विश्वासखंड येथील आहे. इथे डॉ. हर्ष अग्रवाल त्यांची पत्नी रूचि अग्रवालसोबत राहत होते.

Dog fight with attacker but not save women life | महिलेवर तो चाकूने वार करत राहिला, तिला वाचवण्यासाठी पाळीव कुत्र्याने केला त्याच्यावर हल्ला!

महिलेवर तो चाकूने वार करत राहिला, तिला वाचवण्यासाठी पाळीव कुत्र्याने केला त्याच्यावर हल्ला!

Next

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधून हत्येची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. गोमती नगर परिसरात घरात फर्निचरचं काम करण्यासाठी आलेल्या सुताराने धारदार शस्त्राने हल्ला करत एका महिलेची हत्या केली. सुतार घराच्या मालकीनीकडे पैसे मागण्यासाठी आला होता. मात्र, महिलेने पैसे देण्यास नकार दिला तर त्याने तिची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

ही घटना गोमतीनगर परिसरातील विश्वासखंड येथील आहे. इथे डॉ. हर्ष अग्रवाल त्यांची पत्नी रूचि अग्रवालसोबत राहत होते. त्यांनी एमबीबीएसच शिक्षण पूर्ण केल्यानंतर आयटीसी कंपनीत स्टॉकिस्ट म्हणून काम सुरू केलं. हर्ष आपली पत्नी, दोन मुली आणि नोकरासोबत ४ महिन्यांपूर्वी विश्वासखंडमधील घरात शिफ्ट झाले होते. त्यांनी घरातील फर्निचर बनवण्यासाठी कमरूद्दीनला संपर्क केला. कमरूद्दीनने गुलफान आणि तलामुद्दीन यांना डॉक्टरकडे काम करण्यासाठी पाठवले. साधारण अडीच महिने दोघे तेथे काम करत राहिले. (हे पण वाचा : ‘त्या’ तरुणीची आत्महत्या सोशल मीडियावरील आभासी एकतर्फी प्रेमातून, परभणीच्या तरुणाविरुद्ध गुन्हा)

घटनेच्या दिवशी हर्ष ऑफिसमध्ये गेला होता. त्यादिवशी साधारण दुपारी अडीच वाजता पत्नीने त्याला कॉल केला. त्यावेळी पत्नी दुसऱ्या मजल्यावर होती. पती-पत्नी मुलींच्या शिक्षणाबाबत फोनवर चर्चा करत होते. तेव्हाच गुलफान रूममध्ये आला. तो डॉक्टरच्या पत्नीकडे अॅडव्हांस पैसे मागत होता. पण तिने अॅडव्हांस देण्यास नकार दिला. तर त्याने चाकू काढला आणि तिच्यावर वार केला. (हे पण वाचा : पोलीस असल्याची बतावणी करत २७ लाखांची लूट, आरोपी जेरबंद)

आईचा ओरडण्याचा आवाज ऐकून मुलीही तिथे आल्या. तेव्हा गुलफानने मुलींना पकडलं. मुलीला वाचवण्यासाठी आई गुलफामसोबत भिडली. यादरम्यान त्याने महिलेवर चाकूने अनेक वार केले. अशात त्यांचा पाळीव कुत्र्याने महिलेला वाचवण्यासाठी गुलफामवर हल्ला केला. तर गुलफामने त्याच्यावरही चाकूने वार केले. तो गंभीरपणे जखमी झाला. तो त्याच्या मालकिनीला वाचवू शकला नाही. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. आता कुत्रा हॉस्पिटलमध्ये भरती असून जीवन आणि मरणाची लढाई लढतो आहे.
 

Web Title: Dog fight with attacker but not save women life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.