शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

10 लाखांच्या खंडणीसाठी डॉक्टरचे अपहरण,गर्भलिंग चाचणीचा आरोप करून उकळली खंडणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 19:33 IST

हडपसर येथील घटना, खंडणी विरोधी पथकाने पोलिसांसह 4 जणांना घेतले ताब्यात..

पुणे : गर्भलिंग चाचणी केली जात असल्याचा आरोप करून हडपसर भागातील एका डॉक्टरांचे अपहरण करून त्यांच्याकडून खंडणी उकळण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी ७ जणांविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रंजना वणवे (रा. बारामती), नाना फासगे, आरती चव्हाण, तिचा पती आणि दोन साथीदार अशा ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी एका पोलीस कर्मचार्‍यासह ४ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याबाबत खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंंद्र मोहिते यांनीसांगितले की, हडपसरमध्ये एका डॉक्टरांना खंडणी मागण्यात आल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानंतर आम्ही शोध घेऊन डॉक्टरांची भेट घेतली. त्यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्याना विश्वास दिल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. एका पोलीस कर्मचार्‍यांसह चौघांना ताब्यात घेतले आहे. यातील रंजना वणवेही मुख्य सुत्रधार असून त्याच्यावर यापूर्वी ही अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.याबाबत फलटण भागातील एका ४८ वर्षांच्या डॉक्टरांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ही घटना २९ ते ३१ मे दरम्यान हडपसरमधील भेकराईनगर परिसरात घडली.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉक्टर स्त्रीरोगतज्ञ आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते हडपसर भागातील एका खासगी रुग्णालयात काम करत आहेत. आरोपी आरती चव्हाणने काही दिवसांपूर्वी डॉक्टरांबरोबर संपर्क साधला. माझी तपासणी करायची आहे, असे तिने त्यांना सांगितले होते.त्यानंतर चव्हाण कोंढवा भागातील खडी मशीन चौकात त्यांना भेटली होती. त्यानंतर दुसर्‍या दिवशी चव्हाण हडपसर भागातील रुग्णालयात आली. ‘‘मला मुलगा हवा आहे. माझी गर्भलिंग निदान चाचणी करा,’’ असे तिने त्यांना सांगितले. डॉक्टरांनी तिची तपासणी केली आणि तुम्ही गर्भवती नसल्याचे सांगितले. त्यानंतर चव्हाणने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर चव्हाणचा पती रुग्णालयात आला. त्याने रुग्णालयाचा दरवाजा बंद केला.तेवढ्यात चव्हाणबरोबर असलेले साथीदार तेथे आले. आम्ही पोलीस आहोत. तुम्ही गर्भलिंग निदान चाचणी करता. थोड्याच वेळात आमचे साहेब रुग्णालयात येऊन कारवाई करतील, असे सांगून त्यांना धमकावण्यास सुरुवात केली. आरडाओरडा केला तर जिवे मारू, अशी धमकी त्यांनी दिली. हे प्रकरण मिटवायचे असेल तर १० लाख रुपये द्यावे लागतील, असे त्यांना सांगितले.त्यानंतर फिर्यादी डॉक्टर आणि त्यांच्याबरोबर असलेल्या आणखी एका डॉक्टरला आरोपींनी धमकावून मोटारीत बसवले. मोटार सासवडकडे नेण्यात आली. तेथे एका ठिकाणी मोटार थांबविण्यात आली. एका दुकानात त्यांना डांबून ठेवण्यात आले.आरोपींबरोबर असलेला साथीदार प्रदीप फासगे याने हे प्रकरण सात लाख रुपयांत मिटवून टाकू. पोलिसांकडे तक्रार करणार नाही, असे सांगितले. तक्रारदार डॉक्टर आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सहकारी डॉक्टरांनी पैशांची जुळवाजुळव केली.आरोपींना ७ लाख रुपयांची खंडणी देऊन सुटका करून घेतली. याप्रकाराची वाच्यता केल्यास गंभीर परिणाम होतील,अशी धमकी आरोपींनी त्यांना दिली.त्यानंतर ते हडपसर परिसरात आले. चौकशीत रंजना वणवे, आरती चव्हाण आणि साथीदारांनी अशाच प्रकारचा गुन्हा काही दिवसांपूर्वी केल्याची माहिती डॉक्टरांना मिळाली. पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेHadapsarहडपसरKidnappingअपहरणPoliceपोलिसArrestअटक