शहरं
Join us  
Trending Stories
1
काय झालास तू? 'व्होट बँके'साठी महाभियोग प्रस्ताव आणल्याचा आरोप, ठाकरेंना अमित शाहांनी घेरले
2
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
3
"त्यांच्यावर बोलायला मी रिकामा नाही"; राहुल गांधींच्या आरोपांची मुख्यमंत्री फडणवीसांनी उडवली खिल्ली
4
सीतामढी जिल्ह्यात 'HIV ब्लास्ट', आतापर्यंत 7400 HIV ग्रस्त आढळले? डॉक्टर म्हणाले, बाधितांनी निगेटिव्हसोबत लग्न करू नये
5
इस्रायली पंतप्रधानांचा PM मोदींना फोन, या संदर्भात व्यक्त केला आनंद; गाझावरही चर्चा
6
भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू
7
संस्थेची गाडी, हातात अर्ज अन् चर्चांना उधाण; तानाजी सावंतांच्या मुलाने भरला भाजपचा उमेदवारी अर्ज?
8
'उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवताय का?'; मुंढवा जमीन घोटाळ्याच्या FIR वर हायकोर्टाचा पोलिसांना थेट सवाल
9
स्मृती मानधना लग्न मोडल्यावर पहिल्यांदाच सर्वांसमोर, 'तिला' पाहताच मारली मिठी... (VIDEO)
10
STवर ४ हजार कोटींचा आर्थिक भार, देणी कधीपर्यंत फेडणार?; प्रताप सरनाईकांनी तारीखच सांगितली
11
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: लक्ष्मी देवीसह स्वामी सेवा करा; धनधान्य, वैभव, कालातीत कृपा लाभेल!
12
IND vs SA T20: संजू सॅमसनला Playing XI मध्ये का घेतलं नाही? माजी क्रिकेटरने सांगितलं 'लॉजिक'
13
समसप्तक वसुमान योगात कालाष्टमी २०२५: ६ राशींना धनलाभ योग, चौपट भरभराट; पण पैसे उसने देऊ नका!
14
अयोध्येच्या राम मंदिरात दर्शन घ्यायला केव्हा जाणार? अखिलेश यादव यांनी काय उत्तर दिलं पाहा
15
"काय बोलायचं ते मी ठरवेन, तुम्ही सांगू नका..."; अमित शाह-राहुल गांधींमध्ये लोकसभेत खडाजंगी
16
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
17
“ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली ते १ नंबरवरून दोनवर गेले”; जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंना टोला
18
चालत्या बसमधून उचलून २ महिने जेलमध्ये डांबलं; टॉपर विद्यार्थ्याला अडकवणारे पोलीस CCTV मुळे फसले
19
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
20
IPL 2026 Auction : मिनी लिलावाच्या फायनल यादीत घोळ! विराट-क्रिसचं नाव झालेले ‘गायब’, आता...
Daily Top 2Weekly Top 5

पतीच्या हातात ब्रेसलेट पाहून नाराज, मंगळसूत्र न मिळाल्याने हेल्थ ऑफिसरने मारली नदीत उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 10:47 IST

पतीने मंगळसूत्र दिलं नाही म्हणून टोकाचं पाऊल उचललं.

मध्य प्रदेशातील बरवानी जिल्ह्यातील एका कम्युनिटी हेल्थ ऑफिसरने नर्मदा नदीत उडी मारून आत्महत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे पतीने मंगळसूत्र दिलं नाही म्हणून टोकाचं पाऊल उचललं. कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी दिनेश कुशवाह यांनी सांगितलं की, ४० वर्षीय अंगूरबाला लोनखेडेने नर्मदा नदीवरील १२५ फूट उंच पुलावरून उडी मारली. एसडीआरएफच्या पथकाने तिला बाहेर काढलं आणि जिल्हा रुग्णालयात नेलं, परंतु तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबाकडे सोपवण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीनुसार, वादामुळे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर बरवानीजवळील कल्याणपुरा येथून छोटी कसरावड पुलावर स्कूटर घेऊन गेली होती. बरवानी येथील डॉ. सुरेखा जमरे यांनी सांगितलं की, अंगूरबाला लोनखेडे जिल्ह्यातील राजपूर ब्लॉकमधील बोर्ली येथील हेल्थकेअर वेलनेस सेंटरमध्ये कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून तैनात होती.

अंगूरबालाचा पती डॉ. कृष्णा लोनखेडे (इंदूरमधील बालरोगतज्ञ) यांनी स्पष्ट केले की, ती खूप हट्टी होती आणि सोन्याचं मंगळसूत्र खरेदी करण्याचा हट्ट करत होती. काही दिवसांपूर्वी जेव्हा त्यांनी त्यांच्या मुलीसाठी दागिने खरेदी केले तेव्हा मंगळसूत्र खरेदी करण्यास सांगितलं होतं. पण पतीने किंमत जास्त असल्याचं कारण देत नकार दिला. नंतर जेव्हा पतीने सोन्याचे ब्रेसलेट खरेदी केलं तेव्हा अंगूरबाला म्हणाली, "स्वतःसाठी ब्रेसलेट घेतलं पण माझ्यासाठी मंगळसूत्र घेतलं नाही."

तुमचं माझ्यावर प्रेम नाही असं म्हणत अंगूरबाला नाराज होऊन स्कूटरवरून निघून गेली. पतीने ११२ ला फोन करून तिचा पाठलाग केला, पण तिच्यापर्यंत पोहोचेपर्यंत तिने नर्मदा नदीत उडी मारली होती. एसडीआरएफ टीमने तात्काळ बचावकार्य हाती घेतलं आणि तिला बाहेर काढलं. मात्र रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी अंगूरबालाला मृत घोषित केलं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Health Officer Jumps into River After Mangalsutra Dispute: Husband Shocked

Web Summary : Madhya Pradesh health officer Angurbala Lonkhede tragically jumped into the Narmada River after arguing with her husband about a mangalsutra. He had bought a bracelet for himself but refused to buy her the necklace she desired, leading to the fatal incident. A police investigation is underway.
टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसriverनदी