शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

DNA रिझल्ट निगेटिव्ह आला अन् रेपच्या आरोपात तुरूंगात असलेल्या विद्यार्थ्याला मिळाला जामीन, पोलीस हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 14:43 IST

आता पोलीस याचा शोध घेत आहेत की, अखेर अल्पवयीन मुलीसोबत रेप कुणी केला होता आणि अल्पवयीन मुलीने या मुलावर रेपचा आरोप का लावला?

केरळच्या मलप्पुरममधून एक घटना समोर आली आहे. इथे अल्पवयीन मुलीच्या रेपच्या आरोपात तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या एका १२व्या वर्गातील मुलाला जामिन मिळाला आहे. मुलाची डीएनए टेस्ट निगेटिव्ह आल्याच्या आधारावर त्याला जामीन देण्यात आला आहे. आणि आता पोलीस याचा शोध घेत आहेत की, अखेर अल्पवयीन मुलीसोबत रेप कुणी केला होता आणि अल्पवयीन मुलीने या मुलावर रेपचा आरोप का लावला?

अल्पवयीन मुलीवर रेपप्रकरणी तुरूंगात कैद असलेल्या एका आरोपीला पॉक्सो कोर्टाने जामीन दिला आहे.  मंजेरी पॉक्सो कोर्टात केरळच्या मुलप्पुरम जिल्ह्यातील तिरूरंगाडीच्या १२ व्या वर्ता शिकत असलेल्या विद्यार्थ्याला जामीन दिला. १८ वर्षीय विद्यार्थी  ३५ दिवसांपासून तुरूंगात होता. (हे पण वाचा : आईला कानोकान खबर न लागू देता तरूणीने डझनभर पुरूषांसोबत केलं लग्न, असा झाला भांडाफोड)

१७ वर्षीय गर्भवती मुलीच्या जबाबाच्या आधारावर विद्यार्थ्याला २२ जून रोजी पॉक्सो अ‍ॅक्टनुसार अटक करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने शाळेतून स्पेशल क्लास पूर्ण करून घरी येत असलेल्या अल्पवयीन मुलीवर कथितपणे रेप केला. विद्यार्थ्यावर पॉक्सो अॅक्टनुसार अनेक कलमा लावण्यात आल्या.

विद्यार्थ्याच्या विनंतीवरून डीएनए टेस्ट करण्यात आली. विद्यार्थ्याने पोलिसांना सांगितलं होतं की, तो निर्दोष आहे. डीएनए टेस्ट निगेटिव्ह आल्यावर विद्यार्थ्याला शनिवारी तुरूंगातून सोडण्यात आलं. सत्य समोर आल्याने विद्यार्थ्याचा परिवार आनंदी आहे आणि त्यांना आशा आहे की, लवकरच खरा गुन्हेगार पकडला जाईल. पोलिसांनी सांगितलं की, या प्रकरणी दुसरा कुणी आरोपी नाही. त्यामुळे जबाबात काही गडबड आहे की नाही याचा तपास पोलिसांची टीम घेत आहे. 

टॅग्स :KeralaकेरळCrime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषण