शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

शिक्षण संस्थाचालकास २५ लाखांची खंडणी मागणारा समाजवादी पार्टीचा जिल्हाध्यक्ष जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 12:02 IST

दबा धरून बसलेल्या पुंडलिकनगर पोलिसांनी पकडले रंगेहात

ठळक मुद्देतडजोडीत ठरले ५ लाख देण्याचे ठरले 

औरंगाबाद : शिक्षण संस्थाचालकाकडून २५ लाख रुपयांची खंडणी मागणाºया समाजवादी पार्टीच्या जिल्हाध्यक्षासह साथीदाराला पुंडलिकनगर पोलिसांनी रंगेहात अटक केली. ही घटना बुधवारी विद्यानगर येथील जागृत हनुमान मंदिराजवळ घडली. 

अमितकुमार अनिलकुमार सिंग (२८, रा. कुंज, ता. ओहारी, पोलीस ठाणे नवादा, जि. नवादा, बिहार, ह.मु. नवकारयश सोसायटी, पोलीस कॉलनी, पडेगाव) व त्याचा साथीदार प्रशांत राम वाघरे (२९, रा. लिंबगाव, ता. नांदेड, ह.मु. नामदेव पवार यांच्या बिल्डिंगमध्ये गोदावरी लॉनजवळ), अशी अटक केलेल्या खंडणीखोरांची नावे आहेत. सुनील पालवे (रा. अंबिकानगर, गारखेडा) यांच्या ११ शैक्षणिक संस्था आहेत. दोन महिन्यांपासून सिंग हा शैक्षणिक संस्थेची माहिती उघड न करण्यासाठी २५ लाखांची खंडणी मागत होता. पालवे यांनी अखेर सहायक  निरीक्षक  घनश्याम सोनवणे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी खात्रीलायक माहिती जमा केली. 

५ लाखांवर तडजोड झाली अमितकुमार सिंगसोबत चर्चा होऊन पाच लाखांत तडजोड झाली आणि अखेर पैसे देण्याचे ठरले. पुंडलिकनगर पोलीस ठाण्याने सापळा रचला. आरोपीच्या हातात पाच लाख रुपये नोटांचे बंडल असलेले पाकीट देण्यात आले. तक्रारदाराने ठरल्याप्रमाणे इशारा केला अन् आरोपी दोघांना पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेण्यात आले. अमितकुमार सिंगविरुद्ध बेगमपुरा, जिन्सी येथेदेखील गुन्हे दाखल असून, तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. पुंडलिकनगर ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब मुळे, पोहेकॉ. रमेश सांगळे, विठ्ठल फरताळे, बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, प्रवीण मुळे, दीपक जाधव, नितेश जाधव, पोलीस शिपाई अत्तार, शिवा बुट्टे, संतोष बोधक, स्वप्नील विटेकर यांच्या पथकाने पार पाडली.

कागदी नोटांचे बंडलएवढे पैसे आणायचे कुठून म्हणून ५०० रुपये नोटांच्या आकाराच्या कागदाचे १० बंडल तयार करून पाच लाख रुपयांची बतावणी करण्यात आली. आरोपीने बंद पाकिटामधील पाच लाख स्वीकारले. संबंधिताने डोळ्यावरील चष्मा काढला आणि आरोपी जाळ्यात अडकले. 

चारचाकी दोन वाहने जप्तअमितकुमार अनिलकुमार सिंग व त्याचा साथीदार दोन स्वतंत्र महागड्या चारचाकीतून विद्यानगरात आले होते. दोघांनी मिळून पालवे यांच्याकडून बंडल स्वीकारताच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद