प्रवासी बसविण्यावरून वाद; खामगावात ऑटोचालकाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 19:59 IST2021-04-01T19:59:28+5:302021-04-01T19:59:38+5:30
Murder in Khamgaon : आॅटोचालकाची हत्या करण्यात आल्याची घटना निर्मल टर्निंग परिसरात गुरूवारी संध्याकाळी घडली.

प्रवासी बसविण्यावरून वाद; खामगावात ऑटोचालकाची हत्या
खामगाव: प्रवाशांना बसविण्यावरून वाद होऊन एका आॅटोचालकाची हत्या करण्यात आल्याची घटना निर्मल टर्निंग परिसरात गुरूवारी संध्याकाळी घडली. हत्येनंतर परिसरात खळबळ माजल्यामुळे व्यावसायिकांनी सर्व दुकाने बंद केली. घटनास्थळी आसीएफ जवानांसह पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला.
खामगाव शहरातील निर्मल टर्निंगवर आॅटोरिक्षा स्टॉप आहे. येथे पिंचू उर्फ मेहरसिंग गोविंदसिंग चव्हाण रा. सतिफैल खामगाव व अजय विनायक आवटे (वय ४५) रा. लक्कडगंज खामगांव यांच्यात प्रवाशी बसविण्याच्या कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला जावून दोघांमध्ये हाणामारी झाली. दरम्यान, मेहरसिंग चव्हाण याने अजय आवटे याचेवर धारदार वस्तूने वार केला. ज्यामध्ये अजय आवटे गंभीर जखमी झाला. त्याला गंभीर जखमी अवस्थेत खामगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणीनंतर अजयला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी मेहरसिंग चव्हाण याला अटक केली आहे. या घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील हूड आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. दरम्यान निर्मल
टर्निंग परिसरात आरसीएफ, पोलिस पथक तैनात करण्यात आले आहे.